Tuesday, October 22, 2024
HomeराजकीयRaj Thackeray : ना आघाडी, ना युती...; विधानसभेसाठी राज ठाकरेंचा स्वबळाचा नारा,...

Raj Thackeray : ना आघाडी, ना युती…; विधानसभेसाठी राज ठाकरेंचा स्वबळाचा नारा, मेळाव्यात केली घोषणा

मुंबई | Mumbai

मुंबईतील गोरेगाव येथील नेस्कोत आज राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) उपस्थितीत मनसेचा (MNS) कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलतांना राज ठाकरेंनी आगामी विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) पक्ष स्वबळावर लढणार की युतीत? याबाबत भूमिका स्पष्ट केली. तसेच त्यांनी विविध विषयांवर भाष्य करत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीकाही केली.

- Advertisement -

हे देखील वाचा : Sanjay Raut on Baba Siddique : “गृहमंत्र्यांचा राजीनामा नको, आता त्यांना थेट…”; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर संजय राऊत फडणवीसांवर संतापले

यावेळी बोलतांना राज ठाकरे म्हणाले की, “आगामी विधानसभा निवडणुकीत कुठलीही युती किंवा आघाडी न करता स्वबळावर लढण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जोमाने तयारीला लागावे. तसेच निवडणुकीसाठा जागावाटपाची चर्चा सुरू असताना प्रत्येकवेळी विचारावं लागतंय की हा नेता आता कुठे आहे. निष्ठा वगैरे नावाची गोष्ट आहे की नाही? आणि महाराष्ट्रातील जनता यांना भरभरून मतदान (Voting) करते. हे यांचे राहिले नाहीत, तुमचे काय राहणार. अशी अवस्था महाराष्ट्राची करून ठेवली”, असेही त्यांनी म्हटले.

हे देखील वाचा : बाबा सिद्दिकींच्या हत्येमागे बिश्नोई गँगचा हात; आरोपींची नावे आली समोर

पुढे ते म्हणाले की, “कालचा दसरा मेळावा पाहिला. उद्धव ठाकरे इतिहासातून बाहेरच येत नाहीत. सारखे वाघनखे काढतात, इथून अफजल आला, शाहिस्तेखान आला. अरे महाराष्ट्राबद्दल बोल. तिकडे पुष्पाचं वेगळंच चालू आहे. एकनाथ शिंदे, मै आयेलाय असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांची मिमिक्री करून दाखवली. मी असा महाराष्ट्र कधीच पाहिला नाही. कोण निवडून आला, कोणाला मतदान केलं, सध्या ते काय करतात अशा पद्धतीने महाराष्ट्रात मी पाहिलंच नाही. शरद पवार सांगत आहेत की आमचा पक्ष फोडला, तुम्ही काय केलंत आयुष्यभर? १९७८ ला काँग्रेस फोडली, १९९१ ला शिवसेना फोडली, त्यानंतर नारायण राणेंना फोडलं, तुम्ही कसल्या फोडाफोडीच्या गोष्टी बोलत आहात?” असेही राज ठाकरे म्हणाले.

हे देखील वाचा : बाबा सिद्दीकींची हत्या का आणि कशासाठी? धक्कादायक कारणं समोर

… तर महाराष्ट्र बर्बाद झाला म्हणून समजा

रतन टाटांसारखे सरळ, सभ्य लोक तुम्हाला आवडतात मग राजकारणी सभ्य का आवडत नाहीत. आमदार फोडाफोडी करायची आणि राजकारण तापवायचं. एखाद्या पक्षासोबत निवडणुका लढवायच्या आणि परत दुसऱ्या पक्षात जायचं आणि सत्तेमध्ये बसायचं. हेच गेल्या पाच वर्षात आपण बघत आहोत. मग नक्की तुम्हाला आवडते काय? आज जर महाराष्ट्रातील जनतेने निर्णय घेतला नाही तर महाराष्ट्र बर्बाद झाला म्हणून समजा,असेही राज ठाकरे म्हणाले.

हे देखील वाचा : बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने स्वीकारली

शरद पवार नास्तिक आहेत

शरद पवार नास्तिक आहेत, असं खुद्द त्यांची लेक सुप्रिया सुळेंनी लोकसभेत सांगितलं होतं. पण मी जेव्हा हे सांगितलं तेव्हा ते सर्व मंदिरात जाऊन पाया पडायला लागले. पण त्यांचे हे पाया पडणंही खोटं आहे”, अशी टीकाही राज ठाकरेंनी केली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या