मुंबई | Mumbai
राज्यात सध्या आरक्षणाच्या (Reservation) मागणीवरून ओबीसी आणि मराठा (OBC and Maratha) हे दोन समाज आमनेसामने आले आहेत. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) हे ओबीसीमधून आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहेत. तर दुसरीकडे ओबीसी नेत्यांनी (OBC Leader) मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न देता स्वतंत्र्य प्रवर्गातून द्यावे, अशी मागणी लावून धरली आहे. त्यामुळे राज्य सरकार आरक्षणाच्या चक्रव्यूहात सापडल्याचे पाहायला मिळत आहे.
हे देखील वाचा : छगन भुजबळांचे जरांगेंच्या मागणीवर प्रत्युत्तर; म्हणाले, “त्यांचा अभ्यास कमी, मुस्लिम समाजाला…”
या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्यातील जातीय आरक्षणावरून सुरू असलेल्या वादावर प्रतिक्रिया दिली.निवडणुकीच्या दृष्टीकोनातून मनसेच्या (MNS) पदाधिकाऱ्यांची आज राज ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीनंतर माध्यमाशी बोलतांना राज्यातील आरक्षणाच्या वादावर त्यांनी भाष्य केले.
हे देखील वाचा : अठराव्या लोकसभेचे आजपासून पहिले सत्र; बुधवारी अध्यक्ष निवड
यावेळी बोलतांना राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रात (Maharashtra) जातीय विष कधीही नव्हते. कितीही आवडणारा पक्ष असेल किंवा नेता असेल पण असं जर ते करणार असतील तर पुढच्या पिढीनं जगायचं कसं?. महाराष्ट्राचं काय होणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच ज्याप्रकारे उत्तरप्रदेश, बिहारमध्ये सुरू आहे तसं महाराष्ट्रात झाल्यास रक्तपात होईल. या सर्व समाजांना एक गोष्ट समजणे गरजेचे आहे. इतकी वर्षं मी भाषणांमधून सांगत आलोय की जातीपातीतून काहीही होणार नाही. सगळे पुढारी जातीपातींमध्ये द्वेष पसरवून फक्त मतं मिळवतील, असेही राज ठाकरेंनी म्हटले.
हे देखील वाचा : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी PM मोदींनी आणीबाणीचा केला उल्लेख; म्हणाले…
तसेच काल मला कुणीतरी एक क्लिप पाठवली ज्यात लहान लहान मुलं जातींवर बोलत होती. मी फार पूर्वीच म्हणालो होतो की हे सगळं प्रकरण शाळा-कॉलेजांपर्यंत जाणार,असे राज ठाकरे म्हणाले. दोन दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ क्लिप व्हायरल होत आहे. एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने काही शाळकरी मुलींची प्रतिक्रिया घेतल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. या व्हिडीओमध्ये या शाळकरी मुली त्यांच्या वर्गात भिन्न जातींच्या मैत्रिणींमध्ये कशा प्रकारे कटुता निर्माण झाली आहे. याबाबत सांगत आहेत. या व्हिडीओचा संदर्भ घेऊन राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली.
हे देखील वाचा : सिनेगॉग, दोन चर्च आणि एका पोलीस चौकीवर दहशतवादी हल्ला; १५ जणांचा मृत्यू, ६ दहशतवाद्यांना कंठस्नान
राज ठाकरे स्वबळावर निवडणूक लढवणार?
लोकसभा निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदाला, म्हणजेच पर्यायाने देशात एनडीएला आणि राज्यात महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत चर्चेला उधाण आले होते. त्यामुळे
आता विधानसभेला मनसेची नेमकी भूमिका काय? याची उत्सुकता पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर आज निवडणुकीसंदर्भात झालेल्या बैठकीनंतर माध्यम प्रतिनिधींनी राज ठाकरेंना आगामी विधानसभा निवडणुकीत स्वबळावर निवडणूक लढवायचे ठरवले आहे का? असा प्रश्न विचारला असता त्यावर राज ठाकरेंनी “आत्ताच सांगू?” असे म्हटले.यामुळे राज ठाकरे स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा