Monday, October 14, 2024
Homeब्रेकिंग न्यूजअधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी PM मोदींनी आणीबाणीचा केला उल्लेख; म्हणाले…

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी PM मोदींनी आणीबाणीचा केला उल्लेख; म्हणाले…

दिल्ली । Delhi

आजपासून पासून १८व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन सुरू होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासह सारे खासदार आपली खासदारकीची आज शपथ घेणार आहेत. त्यानंतर २६ जून रोजी लोकसभा अध्यक्षांची निवड केली जाणार आहे.

- Advertisement -

आजपासून सुरू होणारे अधिवेशन हे वादळी असणार आहे. भाजपा प्रणित एनडीए सरकारला घेरण्यासाठी विरोधक सज्ज असणार आहेत. दरम्यान, संसदेत जाण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलताना एकीकडे विरोधकांकडून सहकार्य आणि जबाबदार वागणुकीची अपेक्षा ठेवली असताना दुसरीकडे त्यांनी आणीबाणीचा उल्लेख करत काँग्रेसवर टीकास्र सोडलं आहे.

हे ही वाचा : मोदी सत्तेवर येताच अनेक क्रांतिकारी गोष्टी घडल्या; जयंत पाटील असं का म्हणाले?

पंतप्रधान मोदी म्हणाले, १८ वी लोकसभा नवीन ठराव घेऊन काम करेल. नवीन जोश, नवा उत्साह आणि नवी गती मिळवण्याची ही संधी आहे. जगातील सर्वात मोठी निवडणूक अतिशय भव्य आणि दिमाखदार पद्धतीने पार पडली. १४० कोटी भारतीयांसाठी ही अभिमानाची बाब आहे. जगातील सर्वात मोठी निवडणूक शानदार झाली. संसदीय लोकसभेत आजचा दिवस वैभवाचा आहे. स्वातंत्र्यानंतर सलग तिनवेळा विजयाची संधी मिळाली. ६० वर्षानंतर पहिल्यांदा सरकारला तिसऱ्यांदा काम करण्याची संधी मिळाली. आज आणि उद्या नवीन खासदारांचा शपथविधी आहे, असे मोदी म्हणाले.

हे ही वाचा : पुणे जिल्ह्यात पुन्हा ‘हिट अँड रन’! आमदाराच्या पुतण्याने दोघांना चिरडले

तसेच यावेळी पंतप्रधान मोदींनी आणीबाणीच्या ५० वर्षांचा उल्लेख केला. आज आपण २४ जूनला भेटत आहोत. उद्या २५ जून आहे. २५ जूनला भारताच्या लोकशाहीवर काळा डाग लागला होता, त्याला ५० वर्षं पूर्ण होत आहेत. भारताची नवीन पिढी ही बाब कधीच विसरणार नाही की भारताच्या संविधानाला तेव्हा पूर्णपणे नाकारलं गेलं होतं. देशाला तुरुंग करून टाकलं होतं. लोकशाहीला दाबून टाकलं होतं. आज देशातले नागरीक संकल्प करतील की ५० वर्षांपूर्वी केली गेलेली कृती पुन्हा करण्याची भारतात कधी कुणी हिंमत करणार नाही . आपण जिवंत लोकशाहीचा संकल्प करूयात, असे मोदी म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या