Friday, January 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजRaj Thackeray: "संपूर्ण प्रशासन, यंत्रणा सत्ताधाऱ्यांना..."; राज ठाकरेची उद्विग्न प्रतिक्रिया

Raj Thackeray: “संपूर्ण प्रशासन, यंत्रणा सत्ताधाऱ्यांना…”; राज ठाकरेची उद्विग्न प्रतिक्रिया

मुंबई | Mumbai
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज गुरुवारी दादरमधील बालमोहन शाळेतील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. यानंतर राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना निवडणूक आयोगाच्या कारभाराबाबत संताप व्यक्त केला. मार्कर पेनचा वापर हाच विकास आहे का? निवडणूक व्यवस्थेतील त्रुटींवर बोट ठेवत राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सध्या संपूर्ण प्रशासन आणि यंत्रणा ही सत्ताधाऱ्यांना निवडून आणण्यासाठी कामाला लागली आहे. हे काही चांगल्या लोकशाहीचे लक्षण नाही. अशाप्रकारे सत्तेत येण्याला विजय म्हणत नाहीत, असा शब्दांत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी राज्य सरकारला लक्ष्य केले.

- Advertisement -

सध्या निवडणुकीबाबत कशाप्रकारची यंत्रणा सुरु आहे, हे आपण सगळे बघत आहोत. येन केन प्रकारेन निवडणुका जिंकायच्या हे सत्ताधाऱ्यांनी ठरवले आहे. आम्ही दुबार मतदारांचा मुद्दा समोर आणला तेव्हा निवडणूक आयोगाने आमचा याच्याशी काहीही संबंध नसल्याचे सांगितले. दुबार मतदारांनंतर आम्ही व्हीव्हीपॅटचा मुद्दा उपस्थित केला. व्हीव्हीपॅट मशीन नसल्याने आपण दिलेले मतदान आपल्याच उमेदवाराला गेले आहे की नाही, हे कळत नाही. या सगळ्यानंतर निवडणूक आयोगाने पाडू यंत्र आणले. हे पाडू यंत्र मतमोजणीवेळी वापरले जाणार आहे. सरकारने ठरवलेच आहे, विरोधी पक्ष नावाची गोष्ट शिल्लकच ठेवायची नाही, असे राज ठाकरे यांनी म्हटले.

YouTube video player

शाईऐवजी पेन आणले आहे, त्याची शाई पुसली जातेय
हा संपूर्ण प्रकार फ्रॉड आहे.” आज तर वेगळेच दिसतेय. शाईऐवजी पेन आणले आहे, त्याची शाई पुसली जातेय. ही काही चांगली लोकशाहीची लक्षणे नाहीत. अशा फ्रॉड निवडणुका घेऊन अशाप्रकारे सत्तेत येणे म्हणजे विजय म्हणत नाहीत. सत्तेचा किती गैरवापर करायचा याला मर्यादा असायला हव्यात, असेही राज म्हणाले.

मतमोजणीसाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रणांवर विश्वास कसा ठेवायचा
मतदान आणि मतमोजणीसाठी वापरण्यात येणाऱ्या ‘पाडू’ नावाच्या यंत्रावरही राज ठाकरे यांनी शंका व्यक्त केल्या. हे यंत्र कोणत्याही राजकीय पक्षाला प्रत्यक्ष दाखवण्यात आलेले नाही, तसेच VVPAT चा प्रयोग का केला जात नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मतमोजणीसाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रणांवर विश्वास कसा ठेवायचा, असा सवाल त्यांनी उपस्थित करत संपूर्ण प्रणालीवरच बोट ठेवले. जाता जाता राज ठाकरे यांनी आम्हाला काय करायचे ते आम्ही करणार असे म्हणून भाजपला इशारा दिला आहे.

आधी PADU मशीन अन् आता निवडणुक आयोगाचा आणखी एक धक्कादायक निर्णय

सगळ्या गोष्टी चांगल्या लोकशाहीचे लक्षण नाही
याशिवाय, निवडणूक आयोगाने प्रचाराची मुदत संपल्यानंतर राजकीय पक्षाच्या उमेदवारांना शेवटच्या दिवशीही घरात जाऊन मतदारांना भेटण्याची मुभा दिली. सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना पैसे वाटण्यासाठी ही मुभा देण्यात आली. संपूर्ण प्रशासन सत्तेसाठी अशाप्रकारे कामाला लागले आहे. आम्ही हे सगळे रोखण्यासाठी काम करत आहोत. पण या सगळ्या गोष्टी चांगल्या लोकशाहीचे लक्षण नाही. अशाप्रकारे सत्तेत येण्याला विजय म्हणत नाहीत, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

मनसैनिकांना सर्तक राहण्याच्या सुचना
आज सकाळी दादरच्या छबिलदास येथील मतदान केंद्रावर दुबार मतदार पकडला गेला. त्यामुळे आज दिवसभर शिवसैनिक आणि मनसैनिकांनी सतर्क राहून यावर लक्ष ठेवावे. सत्तेच्या गैरवापरला मर्यादा असायला पाहिजेत. भाजपचे नेते विकासाची भाषा करत आहेत. पण शाई पुसून पुन्हा मतदानाला जायचे, याला विकास म्हणायचे का, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

ताज्या बातम्या

‘कल्याण-डोंबिवलीमध्ये जे काही सुरू आहे त्यामुळे राजकारणाची …’ – मनसे अध्यक्ष...

0
मुंबई । हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्म शताब्दी वर्षा निमित्त मुंबईत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकाच व्यासपिठावर एकत्र आले असल्याचे बघायला...