लातूर | Latur
मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. सोलापूर, धाराशिव नंतर ते लातूरमध्ये आहे. ते सोलापूर दौऱ्यावर असतानाच त्यांनी विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारांची घोषणा केली होती. मुंबईतील मनसे नेते बाळा नांदगावकर आणि पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर केली होती. आता राज ठाकरे यांनी लातूरमध्ये तिसरा उमेदवार जाहीर केला आहे.
मनसेचे सरचिटणीस संतोष नागरगोजे यांना लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव आणि आमदार धीरज देशमुख यांच्याविरोधत मनसेचा उमेदवार जाहीर केला आहे.
लातूर येथील शासकीय विश्रामगृहात राज ठाकरे यांनी मनसेचे सरचिटणीस संतोष नागरगोजे यांची लातूर-ग्रामीण विधानसभेसाठी उमेदवारीची घोषणा केली. त्यामुळे, आता धीरज देशमुख यांना मनसेचे संतोष नागरगोजे यांचेही आव्हान असणार आहे. सध्या धीरज देशमुख हे विद्यमान आमदार असून २०१९ च्या निवडणूकीत शिवसेनेच्या सचिन देशमुख यांचा १ लाखांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला होता.
लातूरमध्ये संतोष नागरगोजे हे सध्या मनसेचे शेतकरी सेनेचे प्रदेश अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे. त्यांनी याअगोदर त्यांनी २०१४ मध्ये मनसेकडून लातूर ग्रामीणमधून निवडणूक लढवली होते, आता पुन्हा एकदा संतोष नागरगोजे लातूर ग्रामीण मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या मिशन महाराष्ट्रवर आहेत. मनसे विधानसभेसाठी कंबूर कसून मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतेय.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा