Monday, April 28, 2025
Homeब्रेकिंग न्यूजRaj Thackeray On Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबाबत राज ठाकरे...

Raj Thackeray On Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबाबत राज ठाकरे यांच मोठं वक्तव्य; महिलांना असे पैसे…

मुंबई | Mumbai
विधानसभा निवडणुकांना अवघे काही दिवस शिल्लक राहीले आहे. त्यातच राज्यातील महायुती सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली. आतापर्यंत या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात दोन हप्त्यांचे पैसे प्रत्येकी ३००० रुपये जमा झाले आहेत. आता तिसऱ्या हप्त्याचे १५०० रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. सरकारकडून मतांसाठी ही लाच दिली जाते आहे अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. तसेच उद्धव ठाकरे, शरद पवार, प्रणिती शिंदे, नाना पटोले यांनीही आत्तापर्यंत अनेकदा या लाडकी बहीण योजनेवरुन महायुतीवर टीका केली आहे. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील योजनेसंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे.

काय म्हणाले राज ठाकरे?
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा करतांना त्यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठे वक्तव्य केले आहे. लाडकी बहिण योजनेचा ऑक्टोंबरचा हप्ता दिल्यानंतर शासनाकडे सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार द्यायलाही पैसे राहणार नाही आणि तिजोरी रिकामी होईल, असे राज ठाकरे म्हणाले आहेत.

- Advertisement -

महिलांना असे पैसे देण्यापेक्षा त्यांच्यासाठी नवनवीन उद्योग आणले पाहिजे. त्यांना रोजगार देऊन सक्षम केले पाहिजे. समाजातील कोणताही घटक फुकट काही मागत नाही. सत्ताधाऱ्यांच्या स्वार्थासाठी योजना असेल तर परिणाम वाईट होतो. राज्य खड्ड्यात घातले जात असेल तर ते चुकीचे आहे. ऑक्टोंबरचा हप्ता दिल्यानंतर जानेवारीत तिजोरीत ठणठणाट होऊ शकतो. असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे समर्थन केले आहे. राज्यासाठी राबराब राबणाऱ्या नोकरदारांच्या पगारी करायला जर सरकारकडे पैसे नसतील तर यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट काय असेल, असे प्रणिती शिंदे म्हणाल्या आहेत.

ज्यांच्या पोटात दुखते तेच अशी वक्तव्य करतात
राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर महायुतीमधल्या नेत्याने त्यांना प्रत्युत्तर देत पलटवार केला आहे. ‘ ज्यांच्या पोटात दुखते तेच अशी वक्तव्य करतात’ असं म्हणत महायुतीमधील अजित पवार गटातील नेते प्रफुल्ल पटेल यांनी राज ठाकरेंवर टीका केली. आमच्या सर्व बहिणी आमचं स्वागत करत आहेत, असेही ते म्हणाले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Asaduddin Owaisi : “आमच्या देशाच्या लष्कराचं जेवढं बजेट तेवढं तुमच्या…”; पहलगाम...

0
मुंबई | Mumbai  जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ भारतीयांचा मृत्यू झाला.  या घटनेनंतर देशभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात...