Saturday, November 16, 2024
Homeनाशिकराज ठाकरे दोन दिवस नाशिक दौर्‍यावर

राज ठाकरे दोन दिवस नाशिक दौर्‍यावर

संतश्रेष्ठ निवृत्ती नाथांच्या पालखी सोहळ्यात घेणार सहभाग

नाशिक । प्रतिनिधी Nashik

लोकसभेत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत भूमिका घेत राज ठाकरे यांनी पक्षाची भूमिका जाहीर केली होती. त्यानंतर राज ठाकरे हे नाशिकच्या दोन दिवसीय दौर्‍यावर बुधवार (दि.१९) पासून येत आहे. यावेळी त्यांच्या पत्नी व पूत्र अमित ठाकरे देखील उपस्थित राहणार आहे.

- Advertisement -

राज ठाकरे त्र्यंबकेश्वर येथे संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या समाधी स्थळाला भेट देणार असून, आषाढी वारी व पालखी सोहळ्यात सहभागी होणार आहेत.तसेच त्र्यंबकराजाच्या चरणी लीन होणार आहेत. राज ठाकरे यांच्या दौरा नियोजनासाठी राजगड कार्यालय येथे पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी महापौर अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. त्र्यंबकेश्वर येथील तालुका अध्यक्ष नवनाथ कोठुळे, जिल्हा सचिव भूषण भुतडा यांनी राज ठाकरे यांच्या दौर्‍याचे नियोजन वरिष्ठांना सादर केला.

राज ठाकरे सहकुटूंब दि.१९ जूनला नाशिकमध्ये दाखल होणार आहेत. त्यानंतर दि.२० जूनला ते पालखी सोहळ्यात सहभागी होणार आहेत. तसेच संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतील, त्र्यंबकेश्वर मंदिरात त्र्यंबकराजांंचे ते दर्शन घेणार आहेत. ते येथील विविध संप्रदाय व दिंड्यांची सदिच्छा भेट घेणार आहेत.

या बैठकीत जबाबदार्‍यांचे वाटप करण्यात आले त्यावेळी रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, माजी शहराध्यक्ष दिलीप दातीर, विद्यार्थी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर, महिला सेनेच्या प्रदेश उपाध्यक्षा सुजाता ढेरे आदीसह अंगीकृत वाहिन्यांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या