Friday, January 23, 2026
HomeनाशिकNashik Loksabha 2024 : गोडसे पराभवाच्या छायेत; वाजेंनी घेतली मोठी आघाडी

Nashik Loksabha 2024 : गोडसे पराभवाच्या छायेत; वाजेंनी घेतली मोठी आघाडी

नाशिक | Nashik

नाशिक आणि दिंडोरी लोकसभेसाठी (Nashik and Dindori Loksabha)(दि.२० मे) रोजी मतदान पार पडले होते. त्यानंतर आज मंगळवार (दि.४ जून) रोजी सकाळी आठ वाजेपासून शहरातील अंबड परिसरातील वेअर हाउसमध्ये मतमोजणी सुरु आहे. नाशिकमध्ये मविआचे राजाभाऊ वाजे आणि महायुतीचे हेमंत गोडसे व अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांच्यात लढत होत आहे. तर दिंडोरीत महायुतीच्या भारती पवार आणि मविआचे भास्कर भगरे यांच्यात दुहेरी लढत होत आहे. त्यामुळे यापैकी कुठला उमेदवार बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Loksabha 2024 : सातव्या फेरी अखेर ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे ‘इतक्या’ हजार मतांनी पुढे

YouTube video player

अशातच आता नाशिक लोकसभेच्या अकराव्या फेरीची मतमोजणीची आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीनुसार अकराव्या फेरीत मविआचे उमेदवार राजाभाऊ वाजे १ लाख ३ हजार मतांनी आघाडीवर आहेत. तर चौदाव्या फेरीत हीच आघाडी वाढून १ लाख ४७ हजार १२ इतकी झाली. तर वाजे यांना दहाव्या फेरीत वाजे हे ९४ हजार ७३५ मतांची आघाडी घेतली होती. त्यानंतर ही आघाडी लाखांच्या पुढे गेली.

हे देखील वाचा : Nashik Loksabha Updates 2024 : चौथ्या फेरी अखेर राजाभाऊ वाजे ‘इतक्या’ मतांनी आघाडीवर

दरम्यान, वाजे यांनी तिसऱ्या फेरीत ३० हजार ४८० मतांची आघाडी घेतली होती. त्यानंतर त्यांची ही आघाडी पुढे कायम राहत चौथ्या फेरीत ३६ हजार ३४० इतकी झाली. चौथ्या फेरीत वाजे यांना ०१ लाख १५ हजार ७०९ तर हेमंत गोडसे यांना ७९ हजार ३६९ मते मिळाली. यानंतर पाचव्या फेरीत राजाभाऊ वाजे हे ४८ हजार मतांनी आघाडीवर होते. त्यानंतर वाजे यांनी ही आघाडी सहाव्या आणि सातव्या फेरीपर्यंत कायम ठेवली होती. तर सातव्या फेरी अखेर वाजे हे ६५ हजार मतांनी आघाडीवर होते.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्ह्यात एक लाखांहून अधिक लाडक्या बहिणींची अडचण?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या ऑनलाइन ई-केवायसी प्रक्रियेने नगर जिल्ह्यातही महिलांची डोकेदुखी वाढवली. त्यातच जानेवारी महिन्यात अनेक पात्र...