Thursday, November 12, 2026
HomeनाशिकNashik Loksabha 2024 : सातव्या फेरी अखेर ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे 'इतक्या'...

Nashik Loksabha 2024 : सातव्या फेरी अखेर ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे ‘इतक्या’ हजार मतांनी पुढे

नाशिक | Nashik

नाशिक आणि दिंडोरी लोकसभेसाठी (Nashik and Dindori Loksabha)(दि.२० मे) रोजी मतदान पार पडले होते. त्यानंतर आज मंगळवार (दि.४ जून) रोजी निकाल जाहीर होत आहे. सकाळी आठ वाजेपासून शहरातील अंबड परिसरातील एका गोडाऊनमध्ये या दोन्ही मतदारसंघाच्या मतमोजणीस सुरुवात झाली आहे.

- Advertisement -

नाशिक लोकसभेचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी सुरुवातीपासून आघाडी घेत ती आघाडी सातव्या फेरीपर्यंत कायम ठेवली आहे. वाजे यांनी तिसऱ्या फेरीत ३० हजार ४८० मतांची आघाडी घेतली होती. त्यानंतर त्यांची ही आघाडी पुढे कायम राहत चौथ्या फेरीत ३६ हजार ३४० इतकी झाली. चौथ्या फेरीत वाजे यांना ०१ लाख १५ हजार ७०९ तर हेमंत गोडसे यांना ७९ हजार ३६९ मते मिळाली. यानंतर पाचव्या फेरीत राजाभाऊ वाजे हे ४८ हजार मतांनी आघाडीवर होते.

त्यानंतर वाजे यांनी ही आघाडी सहाव्या आणि सातव्या फेरीपर्यंत कायम ठेवली आहे. सातव्या फेरी अखेर वाजे हे ६५ हजार मतांनी पुढे आहेत. त्यामुळे अखेरच्या फेरीपर्यंत ही आघाडी कायम राहिल्यास वाजेंचा मोठ्या मताधिक्याने विजय होण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार? शिवसेनेच्या ‘या’ नेत्याने उडवली...

0
मुंबई | Mumbai एकीकडे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येण्याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. गुलाबराव पाटलांच्या सूचक...