Friday, May 17, 2024
Homeधुळेराजलक्ष्मी जाधव आज दिल्लीत करणार संचलन

राजलक्ष्मी जाधव आज दिल्लीत करणार संचलन

धुळे । Dhule

येथील श्री. शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या भाऊसाहेब ना.स.पाटील साहित्य व मुफिमुअ वाणिज्य महाविद्यालयातील एनसीसी कॅडेट ज्युनियर अंडर ऑफिसर राजलक्ष्मी प्रशांत जाधव या विद्यार्थीनीची प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील राजपथावरील परेडमध्ये निवड झाली आहे. ती महाराष्ट्राच्या पथकामध्ये संचलन करणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे एनसीसी अधिकारी कॅप्टन डॉ. महेंद्रकुमार वाढे यांनी दिली.

- Advertisement -

प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत होणार्‍या विविध उपक्रमामध्ये महाराष्ट्राचे 115 एनसीसी कॅडेट सहभागी होणार असून, यामध्ये 25 कॅडेट पथसंचलनात, 5 कॅडेट घोडेस्वार पथकात, 9 कॅडेट पंतप्रधान रॅलीत, 11 कॅडेट महामहि राष्ट्रपती मानवंदना ड्रिलमध्ये, 14 कैडेट हे सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये तर बाकी कॅडेट हे विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या छात्रसैनिकांमधून महाराष्ट्राच्या पथकामध्ये धुळ्याच्या एसएसव्हीपीएस महाविद्यालयाची ज्युनियर अंडर ऑफिसर ज्युनियर अंडर ऑफिसर राजलक्ष्मी जाधव राजपथापथावरील संचलनात व पंतप्रधान रॅली मध्ये सहभागी होणार आहे. या शिवाय रजलक्ष्मी ही महाराष्ट्र एनसीसी निदेशालयाच्या सांस्कृतिक पथकातील नृत्यामध्ये नेतृत्व करीत आहे.

एसएसव्हीपीएस महाविद्यालयातील एनसीसी विभागाने आपली परंपरा या वर्षीही कायम राखली असून कोरोना पूर्वी संपन्न झालेल्या परेड मध्ये महाविद्यालायातील तरणप्रीत भुल्लर व या छात्रसैनिकांनी महाराष्ट्राच्या टिमचे प्रतिनिधित्व केले होते. तर या वर्षी राजलक्ष्मीची महाराष्ट्र पथकात निवड झाली. निवडीसाठी गेल्या वर्षभरापासून 48 महाराष्ट्र बटालियन एनसीसीचे कंमाडिंग अधिकारी कर्नल परग कुलकर्णी, छात्रसेनाधिकारी कॅप्टन डॉ. महेंद्रकुमार वाढे, लेफ्टनंट प्रा. क्रांति पाटिल, सुभेदार मेजर सुभाषसिंग यांनी परिश्रम घेतले. आहेत.

राजलक्ष्मी जाधवच्या निवडीबद्दल एसएसव्हीपीए संस्थेचे चेअरमन आ. कुणाल पाटील, उपाध्यक्ष डॉ. संजय पाटील, प्राचार्य डॉ. मनोहर पाटील यांनी कौतूक केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या