Sunday, January 25, 2026
Homeनगरराजापूर येथे शेतमजुरावर बिबट्याचा हल्ला

राजापूर येथे शेतमजुरावर बिबट्याचा हल्ला

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

तालुक्यातील राजापूर (Rajapur) येथे शेतमजुरावर बिबट्याने हल्ला (Leopard Attack) करुन जखमी केल्याची घटना मंगळवारी (दि. 13 ऑगस्ट) सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली आहे. याबाबत वन विभागाकडून (Forest Department) मिळालेल्या माहितीनुसार, रोहिदास मारुती लोहटे (वय 30, रा. उडदावणे, ता. अकोले, ह. मु. राजापूर) हे शेतमजूर म्हणून काम करत आहे. मंगळवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ते शेतात काम करत असताना दबा धरुन बसलेल्या बिबट्याने (Leopard) अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला.

- Advertisement -

यावेळी हाताच्या मनगटाला बिबट्याने चावा घेत, उजव्या हाताच्या खांद्याला व डोक्याच्या मागे नखांनी जखमी (Injured) केले आहे. त्यांनी आरडाओरडा केला असता जवळील शेतकरी (Farmer) मदतीसाठी धाऊन आले. या घटनेची माहिती ग्रामस्थांनी वन विभागाला दिली असता वनपाल सोपान ढवळे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमी लोहटे यांच्यावर घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

YouTube video player

ताज्या बातम्या

Nashik News : घुमल्या घोषणा, दाटली गर्दी; नाशिकमधून ‘लाल वादळ’ मुंबईच्या...

0
पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati शेतकरी (Farmer) आणि कष्टकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पायी निघालेला अखिल भारतीय किसान सभेचा (Kisaan Sabha)...