मुंबई | Mumbai
ड्रीम इलेव्हन आयपीएलमध्ये आज सोमवारी राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सामना खेळवण्यात येणार आहे.
दोन्ही संघांसाठी हा सामना करा वा मरा असा असणार आहे. विजेत्या संघाला बाद फेरीत स्थान मिळवण्याच्या आशा जिवंत ठेवता येणार आहेत. तर पराभूत संघाला स्पर्धेतील आपले आव्हान जवळपास प्ले ऑफ गाठण्याची संधी हुकू शकते.
चेन्नई संघ ६ गुणांनीं सातव्या तर राजस्थान अखेरच्या स्थानावर आहे दोन्ही संघाना आपले उर्वरित ५ किंवा कमीत कमी ४ सामने जिंकावे लागणार आहेत. शारजा येथे झालेल्या सामन्यातील पराभवाचा वचपा काढण्यासाठी चेन्नई काय रणनीती आखतो ? ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
चेन्नई संघाचा अष्टपैलू डीजे ब्रावो दुखापतग्रस्त झाला आहे त्यामुळे त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी याबाबत स्वतः खुलासा केला आहे. त्याच्याजागी मिचेल संतनार याला संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
चेन्नई संघासाठी जमेची बाजू म्हणजे फाफ डू प्लेसिस, शेन वॉटसन फॉर्मात आहेत. त्यांना आपल्या कामगिरीत सातत्य राखण्याची गरज आहे. तर संघासाठी चिंतेची बाब म्हणजे रायडू , धोनी लयीत परतणे संघासाठी गरजेचे आहे. गोलंदाजीत दीपक चहर, शार्दूल ठाकूर चांगली कामगिरी करत आहेत त्यांना इतर गोलंदाजांची साथ मिळणे गरजेचे आहे.
राजस्थान संघाच्या फलंदाजीची मदार स्टीव्ह स्मीथ, संजू सॅमसन, जोस बटलर, रॉबिन उथप्पा, रियन प्राग, यशस्वी जयस्वाल, अनुज रावत यांच्यावर असणार आहे.
– सलिल परांजपे, नाशिक.