Thursday, July 4, 2024
Homeनगर४० रुपये दर द्या, अन्यथा मुंबईला जाणारा दूध, भाजीपाल्याचा पुरवठा रोखू; राजू...

४० रुपये दर द्या, अन्यथा मुंबईला जाणारा दूध, भाजीपाल्याचा पुरवठा रोखू; राजू शेट्टींचा सरकारला इशारा!

राहुरी (तालुका प्रतिनिधी)

- Advertisement -

‘दुधाला किमान ४० रुपये दर मिळावा’ या प्रमुख मागणीसह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर माजी खासदार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राहुरीत रास्ता रोको केला. राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी होते. यावेळी नगर – मनमाड महामार्ग अडवत शेतकऱ्यांनी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

यावेळी, दुधाला किमान ४० रुपये दर देण्याचा निर्णय घ्या. याबाबतचा निर्णय न झाल्यास सोमवारनंतर शांत बसणार नाही. सरकारचं नाक दाबल्याशिवय तोंड उघडत नाही. या मागण्यांबाबत निर्णय घ्यावा अन्यथा मुंबईला जाणारा दूध पुरवठा रोखू, असा थेट इशारा राजू शेट्टी यांनी दिला.

हे देखील वाचा : पावसाने पुन्हा जोर धरला! अनेक भागांसाठी अलर्ट जारी

तसेच, सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांनी यापुढेही शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यांसाठी बरोबर राहावे. चारा, पशुखाद्य, खतांचे दर वाढत आहेत. परंतु दुधाचे दर दररोज घटत चाललेले आहे. त्याचप्रमाणे शासनाने कांद्याच्या दराबाबत निर्यात बंदी करून पाडले. सोयाबीन, कापूस, तुर आधी शेतमालाचे दर पाडण्यासाठी बाहेरून आयात केले. या शासनाचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. असेही ते म्हणाले.

हे देखील वाचा : नाशिक शिक्षक मतदारसंघात किशोर दराडे विजयी

- Advertisment -

ताज्या बातम्या