Friday, May 1, 2026
Homeब्रेकिंग न्यूजRajya Sabha Elections: राज्यसभेसाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शरद पवारांना आव्हान देण्याच्या तयारीत?

Rajya Sabha Elections: राज्यसभेसाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शरद पवारांना आव्हान देण्याच्या तयारीत?

मुंबई | Mumbai
राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाचा मुद्दा उद्भवत नसल्याचे सांगितल्यानंतर काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने शरद पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. काँग्रेसने शरद पवार यांच्या नावाला पाठिंबा दिल्यामुळे महाविकास आघाडीतील राज्यसभा उमेदवाराचा तिढा अखेर सुटला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सर्व जागा बिनविरोध होणार अशी परिस्थिती निर्माण झालेली असतानाच या निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे.

राज्यसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी आणि थेट शरद पवार यांच्या गटाला थेट आव्हान देण्याची तयारी पूर्ण केली आहे. राज्यसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने आपला दुसरा उमेदवार मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतल्याने आता ही निवडणूक बिनविरोध होण्याचे सर्व मार्ग बंद झाले असून, चुरस शिगेला पोहोचली आहे. आमदारांच्या संख्याबळानुसार भाजपचे ४, शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांचा प्रत्येकी १ आणि महाविकास आघाडीचा एक उमेदवार विजयी होऊ शकतो.

- Advertisement -

शरद पवार उमेदवार असतील तर अतिरिक्त उमेदवार उभा केला जाणार नाही असे संकेत महायुतीकडून देण्यात आले होते. शिवसेना ठाकरे किंवा काँग्रेसचा उमेदवार असता तर भाजपाही उमेदवार देणार होती, मात्र तसे झाल्यास मतांची फाटाफूट होण्याची शक्यता होती. दरम्यान भाजपाने तलवार म्यान केली असली तरी एकनाथ शिंदे मात्र आव्हान देण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे.

पडसाद : त्र्यंबकराजाचा असाही प्रसाद

शरद पवारांसमोर शिंदे दोन उमेदवार देणार?
जेष्ठ नेते शरद पवार यांच्या विरोधात शिवसेनेकडून दोन उमेदवार दिले जाण्याची दाट शक्यता आहे. बुधवारी रात्री उशिरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे व मंत्री उदय सामंत यांच्यात बैठक पार पडली. शरद पवारांसमोर एकनाथ शिंदे यांचे मोठे आव्हान उभे राहणार असे दिसत आहे.

ज्योती वाघमारेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता
शिवसेना शिंदे गटाकडून सोलापूरच्या डॅशिंग नेत्या ज्योती वाघमारे यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. दलित समाजातून येणाऱ्या वाघमारे यांचे सहा भाषांवर प्रभुत्व असून, त्यांच्या प्रभावी वक्तृत्वामुळे त्या राजकीय वर्तुळात ओळखल्या जातात. त्यांच्या उमेदवारीमुळे शिवसेनेने एकाच वेळी सोलापूर आणि दलित मतांचे समीकरण साधण्याचा प्रयत्न केला आहे.

घोडेबाजार होण्याची भिती
शिंदे गटाच्या उमेदवारामुळे महाविकास आघाडीच्या, विशेषतः शरद पवारांसमोर मोठे संकट उभे राहण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत अपक्ष आणि लहान पक्षांच्या आमदारांना मोठी मागणी येणार असून, ‘घोडेबाजार’ होण्याची भीती राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केली जात आहे. तर, मविआतील किती आमदारांकडून क्रॉस व्होटींगची ही शक्यता नाकारता येत नाही. शिंदे गटाकडे जवळपास १६ मते अतिरिक्त आहेत. विजयासाठी ३६ मतांचा कोटा आहे. शिंदे यांना राष्ट्रवादी अजित पवार आणि भाजपच्या अतिरिक्त मतांची आवश्यकता भासण्याची चिन्हे आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही खेळी करून आपली ताकद सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांना आपल्या संसदीय कारकिर्दीत आतापर्यंत एकाही पराभवाला सामोरे जावे लागले नाही. या राज्यसभा निवडणुकीत शिंदे गटाने दुसरा उमेदवार उभा केल्यास शरद पवार कशी खेळी करणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

लाडकी

Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट; मुदतीअखेर इतक्या...

0
मुंबई | Mumbaiमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील ५४ लाख महिला या योजनेतून अपात्र ठरल्याची आकडेवारी समोर आली आहे....