Thursday, September 19, 2024
Homeदेश विदेशसीबीआयचे राकेश अस्थाना यांची बीएसएफच्या डीजी पदावर नियुक्ती

सीबीआयचे राकेश अस्थाना यांची बीएसएफच्या डीजी पदावर नियुक्ती

नवी दिल्ली |New Delhi –

- Advertisement -

सीबीआयचे माजी विशेष संचालक राकेश अस्थाना यांची सीमा सुरक्षा दलाच्या(बीएसएफ) मुख्य निर्देशकपदी (डीजी) नियुक्ती करण्यात आली आहे. 2018मध्ये सीबीआय विरुद्ध सीबीआय प्रकरणामुळे ते चर्चेत आले होते. मंगळवारी सकाळी राकेश अस्थाना आपला नवीन पदभार स्वीकारणार आहेत. Rakesh Asthana

राकेश अस्थाना 1984 बॅचचे गुजरात केडरचे अधिकारी आहेत. त्यांनी काही हाय-प्रोफाइल प्रकरणांचा तपास केला आहे. 1997 साली चारा घोटाळ्यात त्यांनी राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना अटक केली होती.

सीबीआयमध्ये ते पोलीस अधीक्षकपदावर होते. 2018 साली लाचखोरीचा आरोप झाल्यानंतर सीबीआयमधून त्यांना हटवण्यात आले. तत्कालीन सीबीआय संचालक आलोक वर्मा यांच्या इशार्‍यावरुन हे सर्व झाल्याचा आरोप अस्थाना यांनी केला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या