Saturday, September 28, 2024
Homeब्रेकिंग न्यूजयुवा शेतकऱ्याला 'आदर्श डाळिंब उत्पादक शेतकरी पुरस्कार'

युवा शेतकऱ्याला ‘आदर्श डाळिंब उत्पादक शेतकरी पुरस्कार’

वावी । वार्ताहर Vavi

- Advertisement -

सिन्नर तालुक्यातील युवा व प्रगतशील शेतकरी राम मोहन सुरसे यांना राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर यांच्या कडून आदर्श डाळींब उत्पादक शेतकरी म्हणून सन्मानित करण्यात आले

राष्ट्रीय डाळींब संशोधन केंद्र सोलापूरचा २० वा स्थापना दिवस डॉ. परमेश्वर शिरगुरे, प्रभारी संचालक यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्रज्ञ व प्रमुख लालासाहेब तांबडे, सहयोगी संशोधन संचालक डॉ. नितीनकुमार रणशूर, वरिष्ठ शास्रज्ञ डॉ. बसवराज रायगोंड,डॉ.दिनेश बाबू इ. उपस्थित होते.

गेल्या वीस वर्षांमध्ये राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूरने संशोधनामध्ये उल्लेखनीय प्रगती केली आहे. या डाळिंब संशोधन केंद्राचा वटवृक्ष होण्याची वाट प्रगतीपथावर आहे. केंद्राने डाळिंब उत्पादक शेतकरी तसेच इतर घटकासाठी वेगवेगळॆ तंत्रज्ञान विकसित केले आहे. यामध्ये केंद्रातील शास्रज्ञ यांचा मोलाचा वाटा आहे. असे प्रतिपादन सोलापूर राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे प्रभारी संचालक डॉ. परमेश्वर शिरगुरे यांनी केले. डॉ. बसवराज रायगोंड यांनी आपल्या मनोगतात डाळिंब केंद्राने करत असलेल्या कामाचे कौतुक केले.

या कार्यक्रमात शेतकऱ्यांचा आणि विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. नाशिक येथील रामहरी सुरसे तसेच कर्नाटक येथील नटेश एशी यांचा प्रगत शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्वच्छता सेवा उपक्रमाअंतर्गत संस्थेतील सफाई कामगारांना सफाई मित्र सन्मान देण्यात आले. यावेळी अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांना ब्रश कटर वाटप करण्यात आले.

स्थापनादिनाचे औचित्य साधून डाळिंब उत्पादनातील तांत्रिक शोधांची या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. प्रमुख पाहुणे तांबडे यांनी आपल्या भाषणात राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूरच्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या विकासातील भूमिकेवर प्रकाश टाकला डॉ. दिनेश बाबू यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. डॉ.रंजन सिंग यांनी आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या