Thursday, May 30, 2024
Homeमुख्य बातम्याखरी शिवसेना कुणाची? रामदास आठवले स्पष्टच बोलले

खरी शिवसेना कुणाची? रामदास आठवले स्पष्टच बोलले

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार (Shinde Fadnavis Government) सत्तेत आले आहे. शिंदे फडणवीस सरकार राहिलेला काल नक्कीच पूर्ण करेल. २०२४ च्या निवडणुकीत भाजप, सेना आणि रिपाइं सोबत लढून २०० पेक्षा जास्त जागा जिंकेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी व्यक्त केला…

- Advertisement -

आम्ही पक्ष बांधणीचा प्रयन्त करत आहोत. आम्ही ज्यांना पाठिंबा देतो तो पक्ष निवडून येतो. तसेच या सरकारमध्ये रिपब्लिकन पक्षाला एक मंत्रिपद मिळावे, राज्यपालनियुक्त 12 आमदारांपैकी एक आमदार आमचा असावा सोबत इतर पदही मिळावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

नाशिक येथे रामदास आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, काँग्रेसच्या (Congress) काळात रस्ते तयार झाले नाहीत. मोदी सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात रस्ते तयार झाले आहे. घराणेशाही नसावी ही मोदींची भूमिका आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळेलच पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिवसेना (Shivsena) कुणाची यावर ते म्हणाले की, शिवसेनेत उभी फूट पडली आहे. मोठ्या प्रमाणात आमदार शिंदे गटात सामील झाले आहेत. खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच (Eknath Shinde) आहे, असे वक्तव्य त्यांनी केले. टू थर्ड आमदार शिंदे गटात असल्याने चिन्ह शिंदेंना मिळेल, अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या अपघाताबाबत ते म्हणाले की, मेटे यांच्या पत्नी आणि आईने शंका व्यक्त केली आहे.अपघाताची चौकशी होणे गरजेचे आहे. योग्य कारवाई झाली पाहिजे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या