Tuesday, February 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजRamdas Kadam: शिवसेना कोणामुळे फुटली? रामदास कदमांनी थेट नावच सांगितल, म्हणाले, या...

Ramdas Kadam: शिवसेना कोणामुळे फुटली? रामदास कदमांनी थेट नावच सांगितल, म्हणाले, या भाXXXXने…

मुंबई | Mumbai
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर स्वरूपाचे आरोप केल्याचे पहायला मिळाले होते. बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यानंतर दोन दिवस त्यांचा मृतदेह तसाच ठेवला होता. तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या हाताचेही ठसे घेण्यात आले होते, असे त्यांनी म्हटले. या आरोपांना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर आज रविवारी रामदास कदम यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेतली ज्यात त्यांनी अनिल परबांच्या आरोपांना प्रत्यूत्तर दिले.

रामदास कदम नेमकं काय म्हणाले?
रामदास कदम म्हणाले की, अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन खालच्या पातळीवर जाऊन माझ्यावर टीका केली. काल जेव्हा अनिल परबची पत्रकार परिषद झाली, तेव्हा मी ती पाहिली नव्हती. त्यांनी नीच शब्द वापरले. बाळासाहेब ठाकरे यांचे पार्थिव २ दिवस मातोश्रीमध्ये ठेवले होते. यावर उद्धव ठाकरे बोलायला पाहिजे होते. पण या भाXXXXने उत्तर दिले. याच्यामुळेच हा पक्ष फुटला आहे. माझावर आरोप केला की, तो डान्सबार आहे. पण,तिथे ऑर्केस्ट्रा होता. उद्धव ठाकरे पण दोन वेळेस बोलेले आहेत. म्हणून मी कोर्टात जाणार आहे, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

- Advertisement -

सर्व लोक पक्षातून बाहेर पडले त्याला हाच चमचा कारणीभूत
कदम यांनी अनिल परब यांच्यावर निशाणा साधताना अनिल परब यांच्यामुळेच शिवसेना फुटल्याचा आरोप केला आहे. पक्ष फुटला, सर्व लोक पक्षातून बाहेर पडले त्याला हाच चमचा कारणीभूत असल्याचा घणाघात यावेळी कदम यांनी केला आहे. परब यांनी त्यांच्या विभागात किती लोक निवडून दिली? त्यांना फक्त चुगल्या करायला आवडतात आणि उद्धव ठाकरे यांना सुद्धा अशीच माणसं आवडतात असे देखील यावेळी कदम यांनी म्हटले आहे.

YouTube video player

म्हणून कुटुंबीयांना बदनाम करण्यासाठी डान्सबार बदनाम केले
फक्त कदम कुटुंबीयांना बदनाम करण्यासाठी डान्सबार डान्सबार म्हणून बदनाम केले गेले. मी कोर्टात जात आहे, हे हॉटेल ३० वर्षापासूनचे आहे. एक तरुणी विक्षिप्त हावभाव करत होती, म्हणून मी त्या शेट्टीला काढले. परवाना रद्द केला. दीड महिन्यानंतर अनिल परब बोलले, त्यांना झोपेतून जाग आली, मुलींचे पैसे खाणारा मी नाहीये, असेही यावेळी कदम यांनी म्हटले आहे. दरम्यान व्हिलेपार्ले येथील एसआरएची योजना सुरू आहे. ती अजून पूर्ण झाली नाही, माझ्याकडे प्रतिज्ञापत्र आहे, अनिल परब यांनी ८ हजार मराठी माणसांना घर खाली करा म्हणून दम दिला, असा आरोपही यावेळी कदम यांनी केला आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अहिल्यानगर महापालिकेत पक्षातंर्गत सव्वा-सव्वा वर्षाचा फॉम्युला

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या (सोमवार) दिवशी, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) युतीने सत्तेचा स्पष्ट फॉर्म्युला...