Friday, May 3, 2024
Homeनगरप्रत्येकाने राम मंदिर उभारणीसाठी दान द्यावे : महंत रामगिरी

प्रत्येकाने राम मंदिर उभारणीसाठी दान द्यावे : महंत रामगिरी

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

हिंदू धर्म जाणून घ्यायचा असेल तर प्रभू श्रीरामचंद्रांना जाणावे लागेल. लाखो वर्षे उलटून गेली मात्र आजही

- Advertisement -

श्रीरामाच्याप्रती भाव प्रत्येकाच्या मनात असून प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार राममंदिर उभारणीसाठी दान द्यावे, असे आवाहन सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी केले.

प्रभू श्रीराम यांच्या जन्मभूमी तिर्थक्षेत्र अयोध्या येथील राममंदिर उभारणीसाठी उत्तर नगर जिल्हा निधी समर्पण अभियान शिर्डी शहरात राबविण्यात आले. याप्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते गजानन शेर्वेकर, जितेंद्र शेळके, साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे, अशोक गोंदकर, हिरामण वारुळे, भाजपचे शहराध्यक्ष सुनील शिंदे, अजित पारख, मनिलाल पटेल, विहिंपचे सुरेंद्र महाले, रमेश बिडवे, विक्रम गोंदकर, किरण बोराडे, सुधीर शिंदे आदी मान्यवरांसह हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते तसेच महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला भगीनींसह शिर्डी गावचे ग्रामदैवत मारुती मंदिराला प्रदक्षिणा घालून करण्यात आली. प्रास्ताविकात विशाल कोळगे यांनी सांगितले की, राम जन्मभूमीसाठी साडेपाचशे वर्षांपासून हिंदू कारसेवकांनी लढा दिला.

त्यामुळे आज अयोध्येत श्री रामजन्मभूमीत भव्य दिव्य राम मंदिर उभारण्यात येत आहे. यावेळी महंत रामगिरी महाराज यांच्याहस्ते प्रभू श्रीरामाच्या मुर्तीची विधिवत पूजा करण्यात आली.

तत्पूर्वी शिर्डी शहरातून मोटारसायकल तसेच ज्योत रॅली काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जय श्रीराम अशा घोषणा दिल्या. शिर्डी शहरातील कारसेवकांचा सत्कार महंत रामगिरी महाराज यांच्याहस्ते करण्यात आला.

याप्रसंगी रामगिरी महाराज म्हणाले की, राम मंदिर उभारणीसाठी प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार दान द्यावे. राममंदिर उत्सव साईबाबांनी सुरू केला आहे. राम मंदिर शिर्डीत व्हावे, अशी साईबाबांची इच्छा होती, असेही त्यांनी सांगितले. यावेळी भाविकांनी चेकद्वारे तसेच रोख स्वरुपात दान दिले. सूत्रसंचालन मनिलाल पटेल यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या