Thursday, May 15, 2025
Homeब्रेकिंग न्यूजRamtek Bunglow: रामटेक बंगला नको रे बाबा! यंदा चंद्रशेखर बावनकुळेंच्या वाट्याला, नेमका...

Ramtek Bunglow: रामटेक बंगला नको रे बाबा! यंदा चंद्रशेखर बावनकुळेंच्या वाट्याला, नेमका इतिहास काय?

मुंबई | Mumbai
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपानंतर, दालने आणि बंगल्याचे वाटप झाले आहे. पण, बंगले वाटपावरुन शिवसेनेतील मंत्री नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. कारण काही मंत्र्यांना बंगल्याऐवजी फ्लॅट दिले गेले आहे. त्यातच सगळ्यात जास्त चर्चेत असलेल्या बंगल्यांपैकी एक असलेला बंगला म्हणजे रामटेक बंगला. हा बंगला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना मिळाला आहे. आता, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना मिळालेला रामटेक बंगला बदलून हवा असल्याची माहिती आहे.

- Advertisement -

मलबार हिलवरील सर्वात प्रशस्त आणि सी-फेसिंग व्ह्यू असलेला बंगला म्हणजे रामटेक बंगला होय. मात्र, याच रामटेक बंगल्याबाबत अनेक घडामोडी घडल्यानंतर अनेक मंत्री नाकं मुरडताना दिसताय. अशातच राजकीय वर्तुळात शुभ-अशुभाची चर्चाही रामटेक बंगल्याबाबत होताना दिसत आहे. परंतु, रामटेक बंगल्याची बावनकुळेंकडून अदलाबदल करणार असल्याची चर्चा सुरु आहे. पंकजा मुंडे यांच्यासोबत बावनकुळे बंगल्याची अदलाबदल करण्याचे म्हटले जात आहे. रामटेक बंगला घेण्याची पंकजा मुंडे यांची तयारी असल्याची माहिती मिळत आहे. कारण या बंगल्यात गोपीनाथ मुंडे हे मंत्री असताना राहिले होते. त्यामुळे पंकजा मुंडे यांचे रामटेक बंगल्याशी भावनिक नातेही आहे. मात्र, रामटेक हा बंगला शापित, अपशकुनी असल्याची चर्चा सुरू असते. त्यासाठी भूतकाळातील काही घडामोडींचा दाखला दिला जातो. रामटेक बंगल्यावर जो मंत्री राहायला येतो, त्याचे मंत्रिपद जाते अशीही चर्चा आहे. त्यामुळेच मंत्री या ठिकाणी राहण्यास कचरतात, अशी चर्चा आहे.

दरम्यान, माजी मंत्री दीपक केसरकर, एकनाथ खडसे आणि छगन भुजबळ यांचे वास्तव्य ह्याच बंगल्यात होते. मात्र अलिकडे झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारात तिन्ही नेत्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळताना दिसलाय, त्यामुळे अनेक उलट सुलट अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

रामटेक अपशकुनी का मानला जातो?
रामटेक बंगल्याबाबत अनेक घडामोडी घडल्यानंतर अनेक मंत्री नाके मुरडताना दिसताय. अशातच राजकीय वर्तुळात शुभ-अशुभाची चर्चाही रामटेक बंगल्याबाबत होताना दिसत आहे. यंदा हा बंगला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना मिळाला आहे. दरम्यान, माजी मंत्री दीपक केसरकर, एकनाथ खडसे आणि छगन भुजबळ यांचं वास्तव्य ह्याच बंगल्यात होते.


शरद पवार – १९७५ च्या आणीबाणीनंतर रामटेक बंगला हा शरद पवारांच्या ताब्यात होता. जेष्ठ समाजसुधारक हमीद दलवाई आजारी असताना रामटेक ह्या बंगल्यावर मुक्कामी होते. त्यांच्या मृत्यूनंतर दलवाईंनी मृत्यूनंतर आपले दफन नव्हे तर दहन करण्यात यावे, अशी इच्छा व्यक्त केली. त्यावेळी शरद पवारांना मोठ्या वादाचा सामना करावा लागला होता.

१९७८ साली वसंतदादा मुख्यमंत्री असताना शरद पवार बाहेर पडले आणि पुलोदचे सरकार आले. तेव्हा शरद पवार याच रामटेक बंगल्यावर मुक्कामी होते.


युती सरकारच्या काळात कृषीमंत्री एकनाथ खडसे यांना रामटेक बंगला मिळाला होता. पण त्यावेळी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यामुळे त्यांना मंत्रिपद सोडावे लागले होते.

२०१९ मध्ये राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. त्या सरकारमध्ये भुजबळ यांना अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालय मिळाले. पण भुजबळ मंत्री असलेले मविआ सरकार अडीच वर्षात कोसळले.

विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळालेले असताना केसरकर यांना मात्र मंत्रिपद गमवावे लागले. फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा पत्ता कापण्यात आला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

नाशिकच्या सीपेट प्रकल्पासाठी विनामोबदला जमीन- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai नाशिक जिल्ह्यातील मौजे गोवर्धन येथे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी (सीआयपीईटी) प्रकल्पासाठी जागा विनामोबदला देण्यासंदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे...