Tuesday, March 25, 2025
Homeक्रीडाRanji Trophy: रोहित शर्माचा रणजी ट्रॉफीमध्येही 'फ्लॉप' शो; जम्मू काश्मिर विरुध्द १९...

Ranji Trophy: रोहित शर्माचा रणजी ट्रॉफीमध्येही ‘फ्लॉप’ शो; जम्मू काश्मिर विरुध्द १९ चेंडूत अवघ्या ३ धावा काढून बाद

मुंबई | Mumbai
टीम इंडियाचा टेस्ट आणि वनडे कर्णधार रोहित शर्मा याने जवळपास एका दशकानंतर रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन केले आहे. बीसीसीआयने टेस्ट क्रिकेट खेळणाऱ्या क्रिकेटर्सना रणजी ट्रॉफीमध्ये खेळणे अनिवार्य केल्यामुळे रोहित मुंबईच्या संघाकडून गुरुवारी जम्मू काश्मीर विरुद्ध रणजी ट्रॉफीचा सामना खेळण्यासाठी उतरला. मुंबईतील बीकेसीच्या मैदानावर मुंबई विरुद्ध जम्मू आणि काश्मीर असा सामना सुरु आहे. एकटा रोहित नव्हे, तर यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे आणि श्रेयस अय्यरसारखे स्टार खेळाडू देखील मुंबईकडून रणजी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरले आहेत. परंतु टीम इंडियाचे स्टार फलंदाज समाधानकारक धावसंख्या करण्यात फेल ठरले.

या सामन्याचा टॉस मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने जिंकला आणि प्रथम फलंदाजी निवडली. यावेळी मुंबईकडून रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल हे दोघे सलामी फलंदाजीसाठी मैदानात उतरले. मात्र यशस्वी ४ धावा करून आकिब नबीच्या बॉलवर LBW बाद झाला तर रोहितचा खराब फॉर्म सुरुच राहिल्याने तो १९ चेंडूत केवळ ३ धावा काढून माघारी परतला.

- Advertisement -
https://twitter.com/stuud18/status/1882285838329123064

या सामन्यात मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे सर्वांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या, कारण रोहित शर्माला लाईव्ह खेळताना पाहण्याची संधी मिळणार होती. तब्बल १० वर्षानंतर रोहित शर्मा रणजी ट्रॉफी खेळायला मैदानात उतरला. रोहितने यशस्वीसोबत डावाची सुरुवात केली. पण दोघांनाही हवी तशी सुरुवात करता आली नाही.

जम्मू-काश्मीर गोलंदाजांनी या दोन्ही सलामीवीर फलंदाजांना बाद करत आपल्या संघाला चांगली सुरुवात करुन दिली. इंडियासाठी सलामी दिली. हे दोन्ही फलंदाज बाद होताच, बऱ्याच चाहत्यांनी स्टेडियममधून बाहेर पडण्यास सुरुवात केली. रोहित शर्मा खेळणार असल्याने क्रिकेट चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती. रोहित आऊट झाल्याने मुंबईची स्थिती ५.५ ओव्हरमध्ये २ आऊट १२ रन्स अशी झाली.

रोहित शर्माने शेवटचा रणजी ट्रॉफी सामना २०१५ मध्ये खेळला होता. यात रोहितने उत्तर प्रदेशच्या संघाविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर ११३ धावांची खेळी केली होती. रोहित शर्माने १२८ फर्स्ट क्लास सामन्यात ९२९० धावा केल्या आहेत. त्याची सर्वोत्कृष्ट धावसंख्या ३०९ इतकी आहे. तर रोहितने फर्स्ट क्लास सामन्यात गोलंदाजी करून २४ विकेट्स सुद्धा घेतल्या आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...