Friday, May 3, 2024
Homeनगरराशीनच्या पालखी उत्सवातून 6 चोरटे ताब्यात

राशीनच्या पालखी उत्सवातून 6 चोरटे ताब्यात

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

कर्जत तालुक्यातील राशीन येथील श्री जगदंबा देवीच्या पालखी सोहळ्यात गर्दीचा फायदा घेऊन चोर्‍या करणार्‍या सहा चोरट्यांना कर्जत पोलीसांनी ताब्यात घेतले. राहुल बापू जाधव (21, रा. दुधनी ता. अक्कलकोट), कृष्णा अर्जुन जाधव (23, रा. सादे, ता. करमाळा), प्रकाश हिरामन डुकळे (19, रा. चौफुला ता. हवेली), शिवाजी भगवान माने (27, रा. देऊळगाव, ता. परांडा जि. उस्मानाबाद), अजित महेंद्र शिंदे (19, रा. पारेवाडी ता. परांडा) व पिल्या सवर्‍या काळे, (20, रा. नेरले, ता. परांडा, जि. उस्मानाबाद) अशी पकडलेल्या संशयितांची नावे आहेत.

- Advertisement -

कर्जत पोलीस ठाण्यात त्यांच्यावर चोरीचा प्रयत्न, तसेच चोरीच्या उद्देशाने संशयितरित्या पालखी उत्सवात फिरणे असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सतिष गावीत, पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, अमरजित मोरे, अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार मारुती काळे, अंकुश ढवळे, संभाजी वाबळे, अमोल लोखंडे, शाम जाधव, भाऊसाहेब काळे, संपत शिंदे, गोवर्धन कदम, सुनिल खैरे, संपत शिंदे, अर्जुन पोकळे, मनोज लातुरकर महादेव कोहक, सचिन वारे, ईश्वर माने यांनी ही कारवाई केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या