Tuesday, March 25, 2025
HomeUncategorizedपेठला रस्ता रोको आंदोलन सुरूच

पेठला रस्ता रोको आंदोलन सुरूच

पेठ मध्ये आंदोलन मागे घेतल्यानंतर जे.पी.गावीत आले, रागावले, पुन्हा आंदोलनास बसले

- Advertisement -

पेठ | प्रतिनिधी Peth

पेसा अंतगत अदिवासी विकास विभागाकडील प्रलंबीत भरती तात्काळ करावी , नाशिक येथे पेसा भरतीसाठी बसलेल्या आंदोलनास पाठींबा तसेच ग्रामपंचायतीस पेसा अंतगत १५ लाख पर्यंतच्या कामास मंजूरी मिळावी , नाशिक – पेठ राष्ट्रीय महामार्गावरील सावळघाट , कोटंबी घाट यांची तातडीने दुरुस्ती व्हावी, तलाठी , ग्रामसेवक मुख्यालयी राहात नसल्याने नागरीकांची होणारी छळवणूक थांबावी . या व अन्य मागण्याचे पूर्ततेसाठी तहसील कार्यालया समोरील बायपास चौफुली समोर भास्कर गावीत यांच्या नेतृत्वाखाली आज सर्वपक्षीय आंदोलन छेडण्यात आले .

ज्या विभागाशी संबंधीत समस्येवर चर्चेनंतर सायंकाळी ६ वाजे दरम्यान तहसीलदार आशा गांगुर्डे यांना निवेदन देऊन आंदोलन मागे घेण्यात आल्याची घोषणेनंतर सकाळ पासून रखडलेली वाहतुक कुर्मगतीने सुरु झालेली असतानांच कॉम्रेड जे पी . गावीत यांचे पेठ मध्ये आगमन झाले . नंतर आपण आंदोलन ठिकाणी येत असल्याचे कळवूनही आंदोलन मागे घेण्याची घाई करण्यात आल्याचे प्रकाराने संतप्त झालेले माजी आमदार कॉम्रेड जेपी . गावीत यांनी माकप कार्यकर्त्याच्या समावेश ७ वाजे पासून पुन्हा रास्ता रोको सुरु करण्यात आल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले आहे.

प्रशासनाकडून मागण्यांबाबत ठोस निर्णय झाले शिवाय आंदोलन मागे न घेण्याचा पावित्र्यामुळे वाहतुक कोंडी वाढत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...