Friday, November 15, 2024
Homeनगरमहंत रामगिरींच्या समर्थनार्थ खैरी निमगावात रास्तारोको

महंत रामगिरींच्या समर्थनार्थ खैरी निमगावात रास्तारोको

खैरी निमगाव (वार्ताहर)

योगीराज गंगागीरी महाराजांच्या पांचाळे येथील 177 व्या सप्ताहात महंत रामगीरी महाराज यांनी प्रवचनाच्या माध्यमातून बांग्लादेशातील हिंदू मुली आणि महिलांवर होत असलेल्या अत्याचाराच्या संदर्भात वक्तव्य केल्यानंतर त्यातील वादग्रस्त विधानावरून मुस्लीम समाज रस्त्यावर उतरला होता. त्यानंतर मात्र, महंत रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ खैरी निमगाव येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

- Advertisement -

शाहा पांचाळे ता.सिन्नर जि. नाशिक येथे सुरू असलेल्या 177 व्या गंगागीरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहाच्या प्रवचनात महंत रामगिरी महाराज यांनी बांग्लादेश येथील परिस्थितीचे वर्णन करताना मांडलेल्या बाबी या धर्मग्रंथात नमुद असून रामगिरी महाराजांना जाणिवपूर्वक त्रास देण्याचे सुरू असलेले षडयंत्र तातडीने थांबवण्यात यावे. महाराजांना संरक्षण मिळावे. तसेच समाजात तेढ वाढेल असे कृत्य करणार्‍यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी.

हे हि वाचा : बिबट्याने डॉबरमन कुत्र्याचा पाडला फडशा

यासह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. तत्पूर्वी ग्रामदैवत वाघाई देवी जवळ सर्व हिंदू बांधवांची बैठक झाली. त्यानंतर श्रीरामपूर – पुणतांबा रस्त्यावरील खैरी निमगाव येथील ओढ्याजवळ रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त तरुणांनी घोषणाबाजी केली. तसेच अनेक हिंदू बांधवांनी आपल्या भूमिका भाषणातून व्यक्त केल्या.

यावेळी गावातील काही तरुणांनी हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या असून त्यांना समज देण्याची मागणी यावेळी उपस्थितांकडून करण्यात आली. दरम्यान उपस्थित जनसमुदायास पोलिसांकडून कायदा व सुव्यवस्था तसेच जातीय सलोखा राखण्याचे अवाहन करण्यात आले. दरम्यान श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी निवेदन स्विकारून तातडीने कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले.

हे हि वाचा : बिबट्याने डॉबरमन कुत्र्याचा पाडला फडशा

गोंडेगाव कडकडीत बंद

गोंडेगाव (वार्ताहर) सरला बेटाचे मठाधीपती मंहत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ काल श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव येथे कडकडीत बंद पाळत रामगिरी महाराजांना एकमुखी पाठिंबा दर्शवण्यात आला.

रामगिरी महाराज यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्याविरुद्ध ठिकठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक ठिकाणी त्यांच्याविरुद्ध मोर्चे काढून त्यांचा निषेध करण्यात आला आहे. या सर्व परिस्थितीत काल गोंडेगाव येथे ग्रामस्थांनी एक बैठक घेतली. त्या बैठकीत सराला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराज यांच्या पाठीशी संपूर्ण गावाने गट तट बाजूला ठेवून एकमुखी पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला.

हे हि वाचा : आवक थांबली, गोदावरीतील विसर्ग बंद! जायकवाडीच्या दिशेने वाहिले 17.8 टिएमसी पाणी

यावेळी अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. रामगिरी महाराज यांनी सनातन धर्म शिकवितांना हिंदू समाजाने एकत्र राहण्याची कशी गरज आहे याबाबत जनजागृती केले आहे. असे यावेळी सांगण्यात आले. महंत रामगिरी महाराज यांच्या सोबत संपूर्ण गाव एकत्रितपणे राहणार असल्याची यावेळी जाहीर करण्यात आले.

रामगिरी महाराजांवर श्रीरामपुरात गुन्हा दाखल

श्रीरामपूर (प्रतिनिधी) इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सराला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराज यांच्यावर श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे हि वाचा : मोठी बातमी! भाजपच्या विनोद तावडेंवर नवी जबाबदारी; ‘या’ अभियानाच्या प्रमुखपदी निवड

नाशिक जिल्हा, सिन्नर तालुक्यातील पंचाळे या गावी आयोजित गांगागिरी महाराजांच्या सप्ताह कार्यक्रमात इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. मुस्लिम समाजाकडून मुस्लिम समाजाच्या भावना दुखविल्या प्रकरणी रामगिरी महाराज यांच्याबाबत संतापाची लाट असून गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी करण्यात आली. त्यानुसार श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात सरवरअली यांनी फिर्याद दाखल केलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या