Wednesday, February 4, 2026
HomeनगरAhilyanagar : हिवाळ्यात चपातीसोबत खावी लागणार भाकर!

Ahilyanagar : हिवाळ्यात चपातीसोबत खावी लागणार भाकर!

दिवाळीनंतर रेशनवर मिळणार ज्वारी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

स्वस्त धान्य दुकानात (रेशनवर) मिळणारे धान्य दिवाळीनंतर बदलणार आहे. गव्हाची सरकारी उपलब्धता कमी झाल्याने लाभार्थ्यांना ज्वारी दिली जाणार आहे. हिवाळ्यात चपातीसोबत ज्वारीच्या भाकरी खाव्या लागणार आहेत. प्राधान्य कुटुंबातील प्रति लाभार्थी दोन किलो गव्हाऐवजी आता एक किलो ज्वारी, एक किलो गहू दिले जाणार आहेत. तर अंत्योदयच्या लाभार्थ्यांना आठ किलो गहू आणि आठ किलो ज्वारी मिळणार आहे.

- Advertisement -

राज्य शासनाकडून ज्वारीची खरेदी मोठ्या प्रमाणात झाल्याने पुरवठा विभागाकडून गव्हासोबत ज्वारीचे नियतन दिले जात आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात 29 लाखांवर लाभार्थ्यांना ज्वारी मिळणार आहे. नगर जिल्ह्यासाठी बुलढाणा येथील गोडाउनमधून ज्वारीचा पुरवठा केला जाणार आहे. गतवर्षीदेखील ज्वारीचे वाटप करण्यात आले होते. परंतु निकृष्ट ज्वारीचा पुरवठा झाल्याने अनेक लाभार्थ्यांनी ज्वारी घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे दुकानदारांवर ज्वारी खपवण्याची नामुष्की आली होती.

YouTube video player

अहिल्यानगर जिल्ह्यात अंत्योदय योजनेत 87 हजार 64 कार्डधारक असून लाभार्थी 3 लाख 86 हजार 34 आहेत. तर प्राधान्य कुटुंब योजनेत 6 लाख 37 हजार 114 रेशनकार्डधारक असून 25 लाख 63 हजार 971 लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांना नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यांत ज्वारीचे वाटप केले जाणार आहे. पुरवठा विभागाकडे तसे नियतनही मंजूर झाल्याचे सांगण्यात आले. गव्हाचे नियतन जवळपास 50 टक्केच कमी करण्यात आले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना गव्हासोबत तेवढीच ज्वारी देण्यात येणार आहे. नोव्हेंबर महिन्यात वाटप होणार्‍या धान्यात हा बदल करण्यात आला आहे. तशा सूचनाही पुरवठा विभागाला प्राप्त झाल्या आहेत.

दोन महिने ज्वारीचा पुरवठा
अहिल्यानगर जिल्ह्यातील लाभार्थ्यांना दिवाळीनंतर ज्वारीचा पुरवठा केला जाणार आहे. दिवाळीचा सण असल्यामुळे ऑक्टोबर महिन्यात ज्वारीची उचल करण्यात आली नव्हती. पुढील दोन महिने मात्र, ज्वारीच घ्यावी लागणार आहे. जेवढे गहू तेवढीच ज्वारी लाभार्थ्यांना मिळणार आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : पाणी व स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन रखडले;...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ व जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हा परिषद (Zilla Parishad) स्तरावर कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर...