Wednesday, January 7, 2026
Homeमहाराष्ट्र…तर मी तुमच्या खात्यातून योजनेचे १५०० रुपये काढून घेईन; आमदार रवी राणा...

…तर मी तुमच्या खात्यातून योजनेचे १५०० रुपये काढून घेईन; आमदार रवी राणा यांचं वक्तव्य

अमरावती | Amravati
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात लोकप्रिय ठरताना दिसत आहे. महिलांचा या योजनेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असतानाच अपक्ष आमदार रवी राणा यांना मुख्यमंत्री माझी लाकडी बहीण योजनेवरुन वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे राणा यांच्या विधानामुळे विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

नेमकं काय म्हणाले रवी राणा?
“सरकारने महिलांना प्रति महिना १५०० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, दिवाळीनंतर ही रक्कम वाढवून तीन हजार रुपये केली पाहिजे. आज सरकारने तुम्हाला १५०० रुपये दिले आहेत. उद्या तुमचा भाऊ म्हणून मी ही रक्कम तीन हजार करण्याची विनंती सरकारकडे केली, तर तुम्हाला तीन हजार मिळू शकतात. पण ते तेव्हाच शक्य होईल, जेव्हा तुम्ही मला तुमचा भाऊ म्हणून मतरुपी आशीर्वाद द्याल. पण जर तुम्ही या निवडणुकीत मला आशीर्वाद दिला नाही, तर तुमचा भाऊ म्हणून मी तुमच्या खात्यातून लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये काढून घेईन”, असे आमदार रवी राणा म्हणाले.

- Advertisement -

विजय वडेट्टीवार यांचा राणांवर निशाणा
आमदार रवी राणांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. रवी राणांनी लाडक्या बहीण योजनेवर विधान केले आहे. आमदार रवी राणा यांच्या वक्तव्यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘महिलांना दिलेला पैसा तुमच्या बापाचा आहे का? असा सवाल करत विजय वडेट्टीवार यांनी रवी राणा यांच्यावर निशाणा साधला आहे.

YouTube video player

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Ahilyanagar : ‘लोकशाही’च्या बळकटीसाठी मतदारांचे योगदान महत्त्वाचे – जीवने

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar महानगरपालिका निवडणूक ही लोकशाही बळकट करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असून या प्रक्रियेत मतदारांचे योगदान महत्वाचे आहे. मनपा स्वीप समितीचे विविध नियोजित उपक्रम हे...