Ravindra Chavhan : भाजपच्या कार्यकारी प्रदेश अध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे.
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्ड यांनी आमदार रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी याबाबतचे पत्रक काढले आहे. त्यामुळे रवींद्र चव्हाण आता भाजपचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करणार आहेत.
रवींद्र चव्हाण यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला नाही. त्यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली जाईल, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. तत्पूर्वी संघटनपर्व पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांना कार्यकारी अध्यक्षपद दिले गेले आहे.
भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जगतप्रकाश नड्डाजी यांनी आज माझ्यावर भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष पदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली. आजच शिर्डी येथे भाजपा महाविजयी अधिवेशनाचीही सुरुवात झाली आहे. असे रवींद्र चव्हाण यांनी आपल्या एक्स सोशल मिडिया वर प्रसिद्ध केले आहे.