Monday, June 17, 2024
Homeजळगावमहामार्गावर नशिराबादजवळ रेमण्ड कर्मचार्‍याचा अपघातात मृत्यू

महामार्गावर नशिराबादजवळ रेमण्ड कर्मचार्‍याचा अपघातात मृत्यू

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

- Advertisement -

भुसावळ तालुक्यातील शिरपूर कन्हाळा या मुळगावी आजारी वडिलांची भेट घेवुन पुन्हा घरी परतणार्‍या मयुर अरुण चौधरी (Mayur Arun Chaudhary) (वय-28) या तरुणाचा अज्ञात वाहनाने (vehicle) दिलेल्या धडकेत (Beats) मृत्यू (Death) झाला आहे. महामार्गावर नशिराबादजवळ ओरिएंट सिमेंटच्यासमोर सोमवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.

शिरपुर कन्हाळा (ता.भुसावळ) येथील मुळ रहिवासी मयुर अरुण चौधरी (वय-28) हा तरुण रेमंड कंपनीमध्ये नोकरीला आहे. तो आई-भाऊ या कुटुंबासह दोन वर्षापुर्वी नशिराबादला मामाच्या गावी राहत होता. मयुरचे वडील अरुण अमृत चौधरी हे मुळगावीच राहत असुन आजारी असतात. सोमवारी सुटी टाकून मयुर वडीलांची भेट घेण्यासाठी मुळगावी त्याच्या दुचाकी एमएच.19.डी.जी.5575 ने गेला होता.

वडीलांची भेट घेतल्यावर नशीराबादकडे घराकडे परतत असतांना सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास भुसावळ जळगाव रोडवरील ओरिएंट सिमेंट फॅक्ट्रीसमोर त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. अपघातात गंभीर जखमी मयुरचा जागीच मृत्यु झाला. अपघाताची माहिती मिळाल्यावर नशिराबाद पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मयत तरुणाची दुचाकी आणि त्याचे फोटो व्हॉटस्पद्वारे नशिराबादचे सरपंच विकास पाटील यांना पाठविले. त्यानंतर त्याची ओळख पटली. महामार्गावर काम करणार्या कामगारांनीच खाजगी वाहनातून मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला.

मयुरच्या मामांसह कुटूंबीयांना कळविल्यावर नातेवाईक जिल्हा रुग्णालयात आले. एमआयडीसी पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला असून शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटूंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. मयत मयुर चौधरी याच्या पश्चात आई अलका, लहानभाऊ किशोर व वडील अरुण चौधरी असा परिवार आहे. किशोर हा गवंडी काम करून उदरनिर्वाहास मदत करतो. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या