नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
भारतीय रिझर्व्ह बँके म्हणजेच आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे त्यांना चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयाकडून तात्काळ कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
शक्तिकांत दास यांना अंडर ऑब्झरवेशन ठेवण्यात आले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांना चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती सध्या ठिक आहे, काळजी करण्यासारखे काही नाही. आरबीआयच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, ६७ वर्षीय शक्तिकांत दास यांना ॲसिडिटीचा त्रास होऊ लागला होता. त्यामुळे तपासणी करण्यासाठी त्यांना चेन्नई येथील अपोलो रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. आता त्यांची प्रकृती व्यवस्थित असून दोन ते तीन तासांत त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
२०१८ मध्ये सरकारसोबत झालेल्या वादानंतर तत्कालीन गव्हर्नर उर्जित पटेल यांनी अचानकपणे आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर केंद्र सरकारने शक्तीकांत दास यांची ३ वर्षांसाठी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून नियुक्ती केली होती. यानंतर त्यांचा कार्यकाळ २०२१ मध्ये ३ वर्षांसाठी वाढवण्यात आला आणि त्यांचा कार्यकाळ या वर्षी १० डिसेंबर रोजी संपत आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा