Sunday, May 26, 2024
Homeनगरशिक्षक संघ जिल्हाध्यक्षपदी तांबे यांची फेरनिवड

शिक्षक संघ जिल्हाध्यक्षपदी तांबे यांची फेरनिवड

अहमदनगर (प्रतिनिधी)-

राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या (State Primary Teachers Association) नगर जिल्हा (Ahmednagar District) संघ अध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष बापूसाहेब तांबे यांची फेरनिवड करण्यात आली. कार्यकारी अध्यक्षपदी गोकुळ कळमकर यांची देखील निवड करण्यात आली.

- Advertisement -

याच प्रसंगी जिल्हा गुरुमाऊली मंडळाचे अध्यक्षपदी राजकुमार साळवे, गुरुमाऊली महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी अंजली मुळे, उच्चाधिकार समितीच्या जिल्हाध्यक्षपदी विठ्ठल फुंदे पदवीधर शिक्षक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी राम वाकचौरे, मुख्याध्यापक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र गजभार, तंत्रस्नेही मंडळाच्या जिल्हाध्यक्षपदी जयेश गायकवाड, कला व साहित्य संघाच्या जिल्हाध्यक्षपदी कारभारी बाबर, तर मनपा संघाच्या जिल्हाध्यक्षपदी दत्तात्रय देशमुख यांची देखील निवड करण्यात आली. महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष विद्युल्लता आढाव तसेच नपा मनपा संघाचे जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र लोखंडे यांच्यासह 11 लोकांची राज्य प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली.

या प्रसंगी निरीक्षक म्हणून राज्य संघाचे उपाध्यक्ष दत्ता पाटील कुलट व नाशिक विभागीय सरचिटणीस सत्यवान मेहर यांचेसह बँकेचे चेअरमन सलीमखान पठाण, संदीप मोटे, राजेंद्र सदगीर, माजी चेअरमन साहेबराव अनाप, संतोष दुसुंगे आदी उपस्थित होते.

राज्य प्राथमिक शिक्षक संघाची जिल्हा कार्यकारिणी पुढील प्रमाणे-

जिल्हाध्यक्ष तांबे, कार्यकारी अध्यक्ष कळमकर, कार्याध्यक्ष राजेंद्र सदगीर, सरचिटणीस मनोजकुमार सोनवणे, कोषाध्यक्ष अशोक गिरी, उत्तर जिल्हाप्रमुख साहेबराव टपळे, दक्षिण जिल्हाप्रमुख किशोर माकुडे, कार्यालयीन चिटणीस नारायण पिसे, शंकर भोसले, प्रसिद्धी प्रमुख मंगेश, प्रदिप रहाणे, उपाध्यक्ष अश्पाक शेख, बाळासाहेब कापसे, सतीश जाधव, संभाजी दराडे, शिवाजी घुले, गौतम साळवे, विनोद सोनवणे, सुभाष औटी, सहचिटणीस सुभाष आमले, केरू डोख, राजू अत्तार, संजय सोनवणे, संतोष आंबेकर, हिरामण गुंड, प्रदिप पिंपरे, रघुनाथ देशमुख ऑडिटर संभाजी एरंडे, राजु आव्हाड, सल्लागार सुनील कुमटकर, भाऊसाहेब सावंत, आबासाहेब सुर्यवंशी, संभाजी पठाडे, मारुती बांगर, सदस्य विक्रम डोळे, राजेंद्र चापे, बबन बांबेरे यांचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या