Saturday, May 25, 2024
Homeमहाराष्ट्रआरटीई प्रवेशासाठी पुन्हा मुदतवाढ

आरटीई प्रवेशासाठी पुन्हा मुदतवाढ

पुणे –

बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) 25 टक्के प्रवेशासाठीच्या जागा अद्यापही रिक्त आहेत. त्यामुळे

- Advertisement -

आरटीई प्रवेशासाठी 27 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

राज्यात प्रवेशासाठी 9 हजार 331 शाळांनी नोंदणी केली. यात 1 लाख 15 हजार 460 जागा उपलब्ध झाल्या. यासाठी 2 लाख 91 हजार 368 मुलांचे अर्ज आले. त्यापैकी प्रवेशासाठी 1 लाख 926 मुलांनी प्रवेश घेतला आहे. यातील 67 हजार 667 प्रवेश निश्‍चित झाले. अद्यापही 47 हजार 793 जागा रिक्त आहेत. आधी 31 ऑगस्टपर्यंत प्रवेशासाठी मुदतवाढ दिली होती. त्यानंतर 15 सप्टेंबरपर्यंत देण्यात आली.मात्र, तरीही बर्‍याचा जागा रिक्त आहेत. त्यामुळे आणखी एक संधी देण्याचा निर्णय प्राथमिक शिक्षण संचालनालयाने घेतला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या