Sunday, November 24, 2024
Homeक्रीडामाही, रैनाची निवृत्ती चटका लावणारी...

माही, रैनाची निवृत्ती चटका लावणारी…

नाशिक | Nashik

कॅप्टन कुल म्हणुन प्रसिद्ध असलेल्या महेंद्रसिंग धोनी याची कारकीर्द अतिशय यशस्वी राहिली. त्याने भारतला तिन्ही क्रिकेट प्रकारात ेजगजेत्ता करण्याची कामगिरी साधली असून तसा तो भारतीय क्रिकेट इतिहासातील एकमेव कप्तान आहे. त्याच्या या कामगिरीत अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनाचाहीमोठा वाटा आहे. या दोघांची निवृत्ती योग्य, मानाने असली तरी ती प्रत्येक भारतीयाच्या मनाला चटका लावणरी आहे. अशा समिश्र प्रतिक्रिया धोनी तसेच रैना यांच्याबाबत नाशिकच्या क्रिकेट क्षेत्रातून उमटल्या.

- Advertisement -

धोनी हा कप्तान म्हणुन सर्वांगांनी योग्य होता. कितीही कठिणी स्थिती असली तरी त्याचा संयम वाखानन्याजोगा होता. याच संयामातून तो संघ बाहेर काढायचाच परंतु सामन्याची विजयी समाप्तीही करायचा. त्याच्या सारखा कप्तान झाला नाही तसेच होणारही नाही. सुरेश रैनाचीही त्याला चांगली साथ लाभली. धोनीने योग्य वेळी निवृत्ती घेतली. त्याचे समर्थनच केले जाईल मात्र तरिही तो विश्‍वकरंडकापर्यंत संघात असायला हवा असे प्रत्येक भारतीयाच्या मनात खंत आहे.

– विनोद शहा, अध्यक्ष नाशिक जिल्हा क्रिकेट संघटना

धोनीच्या निवृत्तीची अनेक दिवसांपासून चर्चा होत होती. तो जेव्हा संघात असायचा तेव्हा तेव्हा संघांचे मनौधर्य कमालीचे उंचावलेले असायचे. तसेच त्याला तितकीच चांगली साथ सुरेश रैनाने दिली. ती अखेर पर्यंत म्हणावी लागेल. या दोघांचेही निवृत्तीनंतर भारतीय क्रिकेटसाठी नक्की योगदान असेल. परंतु कप्तान म्हणुन धोनीचा खेळ , संयम, निर्णय क्षमता, सातत्य या जमेच्या बाजु असून त्याची अद्याप गरज असल्याचे प्रत्येकाला वाटते आहे.

– समिर रकटे, सचिव नाशिक जिल्हा क्रिकेट संघटना

मी संघात नसलो तरी सरावात ध्वनीला बॉलिंग केली आहे. त्याचा खेळ हा जादुई आहे. तसेच तो बाहेरही माणुस म्हणुन खुपच भारी असल्याचा अनुभव मी घेतला आहे. तीच स्थिती रैनाची आहे. त्याच्याबरोबरच अनेक रनजी सामने अगदी नाशिकमध्येही आम्ही खेळलो आहोत. हे दोघे महान फलंदाज निवृत्त झाले असले तरी आमच्या सारख्या नवीन खेळाडूंसाठी त्यांचा आदर्श कायम राहिल. त्यांची निवृत्ती आम्हा सर्वांच्या मनाला चटका लावणरी आहे.

– सत्यजित बच्छाव, रणजी खेळाडू, नाशिक

धोनी अद्यापही खूप फिट खेळाडू आहे. तो अजुनही योगदान देऊ शकतो, परंतु निर्णयाचा एक क्षण असतोच. धोनी तसेच रैना यांनी अगदी योग्य वेळी निर्णय घेऊन आपली मानाने निवृत्ती स्विकारली आहे. कारण आताची भारतीय टिम पाहता बहूतांश युवा खेळाडू आहेत. टीमची भट्टी जमण्यासाठी सर्व एका वयोगटातील असतील तर ते संघांसाठी चांगले असते. वरिष्ठ खेळाडू असेल तर नवे खेळाडू दबावात खेळतात. धोनी व रैनाने यामुळेच नव्या खेळाडूंसाठी जागा खाली केली आहे.

– तरूण गुप्ता, निवड समिती सदस्य, नाशिक

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या