Tuesday, April 23, 2024
HomeUncategorized'अभ्यासक्रम सूचवा आणि बक्षीस मिळवा'!

‘अभ्यासक्रम सूचवा आणि बक्षीस मिळवा’!

औरंगाबाद – aurangabad

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (Industrial Training Institute) नवीन अभ्यासक्रम निवडीच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांसाठी सहभाग घेतला जाणार आहे. कौशल्य विकास (Skill development), रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आजी-माजी विद्यार्थ्यांसाठी ‘सूचवा तुमच्या आवडीचे कौशल्य अभ्यासक्रम’ ही स्पर्धा १ नोव्हेंबरपासून घेऊन आला आहे. सूचविलेले नाव अंतिम झाले तर स्पर्धकाला बक्षीसही देणार देण्यात येणार आहे.

- Advertisement -

एक ते १५ नोव्हेंबर दरम्यान स्पर्धेत नाव सूचवता येणार आहे. जिल्हास्तरावर स्पर्धा होणार आहे. जिल्ह्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रशिक्षण घेणारे अथवा प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना सहभाग घेता येणार असून प्रथम तीन विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वयाची अट नसणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी एक क्यूआर कोड देण्यात आला आले. त्यावर स्कॅन करून किंवा https://forms.gle/ip1haoR1gokgfX1NA या लिंकवर अर्ज करावा लागणार आहे. स्पर्धकांना शेती व्यवसाय क्षेत्र, स्वयंरोजगार क्षेत्र, महिला रोजगार क्षेत्र, उपयुक्त आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रम, अन्य उपयुक्त अभ्यासक्रमाशी निगडीत अभ्यासक्रम सूचवावे लागणार आहे.

शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्याच्या आवडीचे नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी ‘सूचवा तुमच्या कौशल्य अभ्यासक्रमा’च्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी यात सहभाग घ्यावा तसेच नवनवीन अभ्यासक्रम सूचवावेत.

-अभिजीत आलटे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, औरंगाबाद

- Advertisment -

ताज्या बातम्या