Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशco win registration : एकाच दिवसात १.३३ कोटी जणांची नोंदणी

co win registration : एकाच दिवसात १.३३ कोटी जणांची नोंदणी

नवी दिल्ली

देशात कोरोनाचे संकट गंभीर होत आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेमुळे अनेक राज्य हैराण झाले आहेत. आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत आहे. या पार्श्वभूमीवर २८ एप्रिलपासून १८ ते २४ वयोगटाच्या लसीकरणासाठी नोंदणी सुरु झाली आणि पहिल्यात दिवशी तब्बल १.३३ कोटीपेक्षा जास्त जणांनी नोंदणी केली.

- Advertisement -

हनुमानाचा जन्म कुठे? आंध्र प्रदेशात, कर्नाटकात की अंजनेरीत

करोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान लसीकरण मोहीम सुरु केली गेली आहे. लसीकरणाच्या दोन टप्प्यानंतर तिसऱ्या टप्पा १८ वर्षांवरील व्यक्तींसाठी १ मे पासून सुरु होत आहे. यासाठी बुधवार (२८ एप्रिल) पासून ‘कोविन’ (co win ) हे लसीकरण नोंदणी प्लॅटफॉर्म दुपारी ४ वाजता खुले झाले. कोविन’वर रजिस्ट्रेशन सुरू झाल्यानंतर जवळपास १.३३ कोटींहून अधिक लोकांनी लस घेण्यासाठी आपल्या नावाची नोंदणी केली आहे. कोविन या वेबसाईटवर एका मिनिटाला जवळपास २७ लाख हीटस् मिळाले.

Corona vaccine : 18 + साठी आज दुपारी ४ वाजेपासून नोंदणी; जाणून घ्या कसे करावे रजिस्ट्रेशन

महाराष्ट्रात १ मे पासून लसीकरण नाही

महाराष्ट्र आणि राजस्थानात मात्र १ मेपासून लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार नाही. या राज्यांत १८ वर्षांवरील नागरिकांना लसीकरणासाठी आणखीन काही दिवस वाट पाहावी लागणार आहे .राज्याला मोठ्या प्रमाणावर लस उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे १ मे पासून राज्यात लसीकरण सुरू होणार नाही, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे येत्या १ मे रोजी राज्यातील १८ वर्षांवरील व्यक्तींचं लसीकरण होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.

समितीची स्थापना होणार

१८ – ४४ वयोगटातील लोकांना विनंती आहे की त्यांनी सबुरीनं घ्यावं लागेल. लसीच्या कमतरतेमुळं १मेपासून लसीकरण शक्य नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. १८ ते ४४ वयोगटातील ५ कोटी लोकांचं लसीकरण एकाच वेळी करणं शक्य नाही. त्यामुळं एका समितीची स्थापना करण्यात येणार आहे. ही समिती एक मायक्रोप्लानिंग करणार आहे. त्यामध्ये वयोगटानुसार लसीकरण राबवण्याची चर्चा करण्यात येईल. १८- ४४ वयोगटासाठी वेगळी लसीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे. तिथं फक्त याच वयोगटातील लोकांचं लसीकरण करण्यात येईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या