मुंबई | Mumbai
सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी कर्जत येथील एन.डी. स्टुडिओमध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याने सिनेसृष्टीत मोठी खळबळ उडाली आहे. देसाईंच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नसून त्यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जात आहे. अशातच आता पोलिसांच्या (Police) हाती नितीन देसाई यांनी आत्महत्येपूर्वी रेकॉर्ड केलेल्या काही ऑडिओ क्लिप हाती लागल्या आहेत…
Nitin Desai Death : नितीन देसाईंनी बनवलेला ND Studio नेमका कसा आहे? जाणून घ्या सविस्तर
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नितीन देसाई यांनी आत्महत्या (Suicide) करण्यापूर्वी व्हॉईस नोट रेकॉर्ड केल्याचे समोर आले आहे. या व्हॉईस नोट रेकॉर्डमध्ये चार व्यावसायिकांची नावे असल्याचे बोलले जात आहे. देसाई काल रात्री दिल्लीहून मुंबईला (Mumbai) विमानाने आले. त्यानंतर मुंबई एअरपोर्टवरून रात्री अडीच वाजता गाडीने ते कर्जतमधील एनडी स्टुडिओत आले. त्यावेळी त्यांनी तिथल्या मॅनेजरशी बोलत तुला उद्या सकाळी मी व्हॉईस रेकॉर्डर देतो असे सांगितले होते.
Nitin Desai Death : ‘असा’ होता नितीन देसाईंचा जागतिक दर्जाच्या कलाकारापर्यंतचा प्रवास
त्यानुसार मॅनेजरने व्हॉईस रेकॉर्डरसाठी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, सकाळी मेगाहॉलजवळ नितीन देसाई गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यावेळी हा व्हॉईस रेकॉर्डर त्यांच्या मृतदेहाच्या (Dead Body) बाजूलाच होता. पोलिसांनी तो ताब्यात घेऊन तपास सुरु केला आहे. त्यामध्ये काही व्हॉईस नोट असून चार व्यावसायिकांनी आपल्याला कसे छळले, आर्थिक व्यवहारानंतर कसा दबाव आणला, हे ध्वनिमुद्रित केल्याची माहिती मिळत आहे.
सुप्रसिध्द कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांची आत्महत्या
दरम्यान, देसाईंच्या आत्महत्येप्रकरणी आकस्मिक मृत्यूची (Death) नोंद करण्यात आली असून याप्रकरणाची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. तसेच ऑडिओ क्लिपमध्ये उल्लेख असलेल्या चार व्यावसायिकांची देखील चौकशी होण्याची शक्यता असून तपास करुन पोलिस त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
ND Studio बनवण्याचं कारण ठरला होता हॉलिवूड अभिनेता!