Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याRedmi 9 Prime ची भारतात ही असेल किंमत

Redmi 9 Prime ची भारतात ही असेल किंमत

दिल्ली | Delhi

शाओमी Xiaomi कंपनीचा रेडमी Redmi या मालिकेतील रेडमी 9 प्राईम Redmi 9 Prime फोन उद्या भारतात लॉन्च होणार असल्याची माहिती भारतातील शाओमीचे व्यवस्थापकीय संचालक आणि जागतिक उपाध्यक्ष मनु कुमार जैन यांनी ट्विटरवरून दिली आहे.

- Advertisement -

मागच्या महिन्यात या फोनचे लॉन्चिंग चीनमध्ये झाले होते. रेडमी 9 Redmi 9 मालिकेतील या फोनमध्ये थोडे बदल करून नवीन आवृत्तीत उपलब्ध होणार आहे. या फोनची भारतात 10000 रुपये किंमत असण्याचा अंदाज आहे. 4 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता Amazon या ई कॉमर्स संकेतस्थळावर या फोनचे लॉन्चिंग होणार आहे.

या फोनची स्क्रीन 6.53 इंच पूर्ण एचडी प्लस डिस्प्ले दिला जाऊ शकतो. या फोनमध्ये वॉटरड्रॉप नॉच सुविधा असू शकते. याचे रिझोल्युशन 1080×2340 पिक्सलमध्ये येऊ शकते.

शाओमी कंपनीच्या विविध समाज माध्यमांच्या व्यासपीठावरून या फोनचे प्रक्षेपण होणार आहे. तसेच ई-स्टोर आणि दुकानांमध्येही लवकरच हा फोन विक्रीस उपलब्ध होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या