Tuesday, February 3, 2026
HomeनगरAhilyanagar : ‘रिलस्टार’ युवती निघाली बसमधील दागिने चोर

Ahilyanagar : ‘रिलस्टार’ युवती निघाली बसमधील दागिने चोर

‘बंटी-बबली’ जोडी एलसीबीच्या सापळ्यात

अहिल्यानगर / पाथर्डी |प्रतिनिधी| Ahilyanagar | Pathardi

सोशल मीडियावर 50 हजारांहून अधिक फॉलोवर्स असणारी ‘रीलस्टार’ युवती प्रत्यक्षात सराईत चोर निघाल्याचे समोर आले आहे. तिच्यासह प्रियकर अशा ‘बंटी-बबली’ जोडीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडताच तब्बल 11 गुन्ह्यांची मालिका उघडकीस आली.

- Advertisement -

स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत कोमल नागनाथ काळे (वय 19, रा. पाथर्डी रस्ता, भीमसेननगर, शेवगाव) व तिचा प्रियकर सुजित राजेंद्र चौधरी (वय 25, मूळ रा. निपाणी जळगाव, ता. पाथर्डी; सध्या रा. शंकरनगर, शेवगाव) हे दोघे अटक झाले. दोघांकडून 9 लाख 35 हजार 320 रूपयांचा सोन्या-दागिन्यांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. 19 नोव्हेंबर रोजी पाथर्डी ते कल्याण एसटी बसने प्रवास करणार्‍या अलका मुकुंद पालवे (रा. देवराई, ता. पाथर्डी) यांच्याकडील सोन्याचे दागिने व रोकड चोरल्याची फिर्याद पाथर्डी पोलिसात दाखल झाली होती. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी बसमधील चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सक्रिय झाले.

YouTube video player

व्यावसायिक कौशल्याचा वापर करत पथकाने कोमल हि पाथर्डीतील नवीन बसस्थानक परिसरात फिरत असल्याची माहिती मिळवली. सापळा रचून तिला जेरबंद केले. चौकशीत तिने चोरीचे दागिने प्रियकर सुजित चौधरीकडे दिल्याचे कबूल केले. त्यानंतर पथकाने शेवगाव येथील शंकरनगरात धाड टाकून सुजितला अटक केली. चोरी केलेल्या रोकडीतून कोमलने 1 लाख 70 हजारांचा आयफोन 17 प्रो मॅक्स, 15 हजारांचा ओप्पो मोबाईल विकत घेतला. तब्बल 6.5 तोळे सोन्याचे दागिने सुरेंद्र चौधरीकडे दिले होते. दोघांकडून जप्त केलेला एकूण मुद्देमालाची किमत 9 लाख 35 हजार 320 रूपये आहे. या जोडीने अमरापूर-शेवगाव व पाथर्डी-भगूर या एसटी बसमध्येही महिलांकडील सोन्याचे दागिने व रोकड चोरल्याची कबुली दिली आहे.

गुन्ह्यांचे रेकॉर्ड
कोमल काळे हिच्याविरूध्द शेवगाव पोलीस ठाण्यात दोन, सुपा पोलीस ठाण्यात एक, तसेच बीड जिल्ह्यातील शिरूर कासार व गेवराई पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. सुजित चौधरी याच्यावर अहिल्यानगर जिल्ह्यातील सोनई, पाथर्डी, तोफखाना, एमआयडीसी पोलीस ठाणे व बीड जिल्ह्यातील चकलंबा पोलीस ठाण्यात दरोडा, जबरी चोरी, घरफोडी यांसह 8 गुन्हे दाखल आहेत.

ताज्या बातम्या

टॅरिफ

India-US Tariff: ग्रेट डील! अमेरिकन टॅरिफवरुन भारताला मोठा दिलासा; २५ टक्क्यांवरुन...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांचे ‘अमेरिका फर्स्ट’ हे धोरण राबवण्यासाठी भारतावर तब्बल 25 टक्के टॅरिफ 1 ऑगस्ट 2025...