Friday, May 17, 2024
Homeनाशिकजिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडून जादा घेतलेले शुल्क परत; विठोबा द्यानद्यान यांच्या लढ्याला यश

जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडून जादा घेतलेले शुल्क परत; विठोबा द्यानद्यान यांच्या लढ्याला यश

नाशिक। Nashik (प्रतिनिधी)

जिल्हा क्रीडा विभागातील जन माहिती अधिकारी यांनी गेल्या सप्टेंबर महिन्यात माहिती अधिकारात आठ पाणांचे सोळा रुपये ऐवजी तब्बल तीनशे रुपये बेकायदेशीरपणे वसूल केले होते.

- Advertisement -

तदनंतर माहिती अधिकार कार्यकर्ते विठोबा द्यानद्यान यांनी याबाबत मुख्यमंत्री कक्ष नाशिक विभाग, राज्य माहिती आयोग, जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करून वेळोवेळी पाठपुरावा केला होता.

द्यानद्यान यांनी त्यांना कायदा दाखवल्यानंतर त्यांना उपरती झाली. तद्नंतर त्यांनी द्यानद्यान यांना सहा महिन्यांनंतर दि.१ मार्च २०२१ रोजी धनादेशाद्वारे तीनशे रुपये परत केले आहेत.

दरम्यानच्या काळात भरलेल्या पैशामुळे माझी आर्थिक, मानसिक, शारीरिक कुचंबणा झाली त्याचे काय? असा सवालही द्यानद्यान यांनी उपस्थित केला आहे.

समस्त माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी कार्यालयातील अधिकार्‍यांनी आपणाकडून बेकायदेशीर पैसे वसूल केले असतील तर आपण तेथून परत घ्यावे , वा मला याबाबत कळवावे, मी आपले पैसे परत मिळवण्यासाठी प्रयत्न करेल.असे आवाहन विठोबा द्यानद्यान यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या