Friday, May 3, 2024
Homeनाशिकdeshdoot.com च्या नोंदणीचा आज शुभारंभ

deshdoot.com च्या नोंदणीचा आज शुभारंभ

नाशिक । प्रतिनिधी Nashik

गणेश चतुर्थीच्या दिवशी १९७० साली सुरू झालेल्या दैनिक ‘देशदूत’ला ५० वर्षे झाली आहेत. या वाटचालीत पत्रकारितेला विविध आयाम जोडत ‘देशदूत’ची वाटचाल उल्लेखनीय झाली आहे. येणार्‍या काळाकडे बघण्याची दृष्टी बाळगलेल्या ‘देशदूत’ने नेहमीच नवयुगाकडे झेप घेतली आहे. आज पन्नाशीच्या उंबरठ्यावर उभे राहताना बदलत्या काळातील माध्यमांचे बदलते स्वरूप लक्षात घेता ‘देशदूत’ नवीन स्वरूपातील आणि नवीन ढंगातील deshdoot.com ही वेबसाईट घेऊन आला आहे.

- Advertisement -

२००४ साली वेबसाईट लॉन्च करणारे मराठी पत्रकारितेतील पहिले दैनिक असण्याचा मान ‘देशदूत’ने पटकावला आहे. ‘काळानुरूप तंत्रज्ञान’ हे ब्रीदवाक्य घेऊन पुढे जाताना अ‍ॅप, सोशल मीडियाचा वापर करून ‘देशदूत’ १३७ देशांत पोहोचण्यात यशस्वी झाला आहे.

‘देशदूत’च्या डिजिटल प्रवासातील दमदार पाऊल म्हणजेच deshdoot.com चे नोंदणीकृत सदस्यत्व! यूजरसाठी हे पाऊलदेखील घ्यायची हिंमत ‘देशदूत’ वृत्तसमूहाने दाखवली आहे. यूजरपर्यंत ज्ञान आणि करमणूक कमीत कमी वेळात आणि जास्तीत जास्त पारदर्शक पोहोचवण्यासाठी ‘देशदूत’ कटिबद्ध आहे.

आजही माध्यमांमध्ये ‘देशदूत’ची वेबसाईट ही तिच्या विश्वासार्हतेमुळे वाचकांच्या प्रथम पसंतीस पडताना दिसते. ‘बातमी deshdoot.com वर नसली म्हणजे ही बातमी खरी नाही’ हा वाचकांचा विश्वास आम्ही नेहमी अनुभवतो. याच विश्वासाची जबाबदारी ‘देशदूत’ पूर्णपणे बाळगून आहे.

नवीन स्वरूपात येणार्‍या deshdoot.com वर स्थानिकपासून जागतिक पातळीवरच्या बातम्या, घडामोडी तसेच उत्तर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत घडणार्‍या घडामोडी वशीहवेेीं.लेा वर ऐकायला, बघायला व वाचायला मिळतील. याबरोबरच विविध विषयांवरचे लेख, ब्लॉग्ज यातून लेखकांची मते जाणून घेता येतील. राजकीय बातम्या, राजकीय पटलामागे घडणार्‍या घडामोडी निर्भीडपणे मांडणारे deshdoot.com असेल.

तसेच या वेबसाईटमध्ये ‘पॉडकास्ट’ हे विशेष आकर्षण ठरेल. रोज सकाळी ग्रामीण व शहरी भागांतून येणारे न्यूज बुलेटिन, पॉडकास्टवरील मुलाखती, गप्पा अशी अनेक माहितीपूर्ण व मनोरंजनात्मक सदरे ऐकायला मिळतील.

व्हिडिओ स्टोरीजमधून आपल्या आजूबाजूला घडणार्‍या दैनंदिन गोष्टींचा वेध आमचे व्हिडिओ जर्नालिस्ट आपल्यापर्यंत घेऊन येतील. या वेबसाईटवरचा फोटो सेक्शन उत्तर महाराष्ट्रातील नैसर्गिक समृद्धी, ज्वलंत प्रश्न, शेतीविषयक बाबी आणि बातम्या या फोटोंच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतील.

याबरोबरच संवाद कट्टा, कल्चर कट्टा, विशेष मुलाखती, हम दोनो, आम्ही, आमच्या गप्पा अशी खास सदरे वशीहवेेीं.लेा वरच ऐकावयास मिळतील. माहिती, ज्ञान, करमणुकीचा हा सर्व खजिना एका क्लिकवर उपलब्ध असेल.

डेस्कटॉप, लॅपटॉप, टॅब आणि स्मार्टफोन या स्क्रिनवर अतिशय सहज व सुटसुटीतपणे ही वेबसाईट वापरता येऊ शकते. त्याचा वापर वाचक त्यांची मते नोंदवायलासुद्धा करू शकतात. अर्थात हे सर्व नोंदणीकृत सभासदांना उपलब्ध होऊ शकेल आणि तेसुद्धा नोंदणी मूल्य मात्र १ रुपया प्रतिदिन इतक्या किरकोळ शुल्कात!

‘तंत्रज्ञानाची कास धरून ‘देशदूत’ने नेहमीच यशस्वी वाटचाल केली आहे. सध्या माध्यमांसाठी आव्हानात्मक परिस्थिती असली तरी ‘देशदूत’ वाचकांसाठी कटिबद्ध आहे. जबाबदारीची जाण ठेवूनच वेबसाईटच्या या नवीन स्वरुपाचे पाऊल आम्ही टाकत आहोत. आतापर्यंत ज्या पद्धतीने वाचकांनी deshdoot.com ला भरघोस प्रतिसाद दिला आहे, त्याहूनही जास्त प्रतिसाद मिळण्याची खात्री आम्हाला आहे. उत्तर महाराष्ट्रातल्या मातीतील दैनिक म्हणून ‘देशदूत’ बदलत्या काळाला उत्साहाने सामोरे जाण्यास सिद्ध आहे.

जनक सारडा, मॅनेजिंग डायरेक्टर, देशदूत

- Advertisment -

ताज्या बातम्या