Tuesday, March 25, 2025
HomeनाशिकNashik News : 'लाडका भाऊ'साठी ४ हजारांवर युवकांची नोंदणी

Nashik News : ‘लाडका भाऊ’साठी ४ हजारांवर युवकांची नोंदणी

नाशिक | Nashik

राज्य सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेपाठोपाठ बेरोजगार युवकांसाठी ‘लाडका भाऊ’ योजना जाहीर केलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या उपक्रमात जिल्ह्यातील ४ हजार ४५७ युवकांनी नोंदणी केली आहे. त्यांना शिक्षणाच्या पात्रतेनुसार प्रतिमहिना ६ ते १० हजार रुपयांपर्यंत मानधन मिळणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik News : जिल्ह्यात आतापर्यंत ‘इतक्या’ लाख लाडक्या बहि‍णींचे अर्ज मंजूर

महाराष्ट्रातील बेरोजगार (Unemployed) युवकांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी लाडका भाऊ अर्थात युवा कार्य प्रशिक्षण योजनेची घोषणा केली. त्यानुसार राज्यातील १८ ते ३५ वयोगटातील इ. बारावी उत्तीर्ण प्रशिक्षणार्थीना दरमहा ६ हजार रुपये मानधन मिळेल. तसेच पदविका (डिप्लोमा) व आयटीआयधारकांना दरमहा ८ हजार रुपये, पदवी व पदव्युत्तर पदवी धारकांना (Degree Holders) १० हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे.

हे देखील वाचा : अजित पवारांचा जनसन्मान यात्रेतून महिलांना शब्द; म्हणाले, “तुमच्या विश्वासाला…”

नाशिक जिल्ह्यातून (Nashik District) एकूण ४ हजार ४५७ युवा बेरोजगारांनी नोंदणी केली. यात बारावी उत्तीर्ण ४४६ युवक, पदविकाधारक १ हजार ३३७ तर, पदवी व पदव्युत्तर पदवी धारक रहजार ६७४ युवकांचा समावेश आहे. नोंदणी केलेल्या एकूण युवकांमध्ये १ हजारांवर युवकांची नोंदणी ही शासकीय कार्यालयांमध्ये झाली तर उर्वरित हे खासगी अस्थापनांमधील आहेत. या सर्वांना राज्य शासनाच्या नियमांनुसार प्रतिमहिना मानधन देण्यात येणार असल्याचे अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी शुक्रवारी (ता.९) पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी महात्मा गांधी रोजगार हमी योजना विभागाच्या उपजिल्हाधिकारी सुरेखा चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बिडकर उपस्थित होते.

हे देखील वाचा : Nashik Rain News : नाशकात पावसाची हजेरी

१५ हजार युवकांना संधी

जिल्ह्यात शासकीय व खासगी अस्थापनांमधील १५ हजार कार्य प्रशिक्षणाच्या संधी या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. त्यापैकी शासकीय कार्यालयांमध्ये एक हजारांवर पदे रिक्त आहेत. त्यासाठी आयटीआय, पदवी, पदव्युत्तर पदवी, व्यावसायिक शिक्षण घेतलेल्या उमेदवार पात्र ठरणार आहेत. खासगी आस्थापनांमध्ये ४ हजार २०० पेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. यासाठी आयटीआय, पदवी, पदव्युत्तर पदवी धारक पात्र ठरत आहेत. कार्य प्रशिक्षणाचा कालावधी हा सहा महिन्यांचा असणार आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...