Saturday, March 29, 2025
Homeराजकीयकरोना रुग्णांना नातेवाईक सीसीटीव्हीद्वारे पाहू शकणार

करोना रुग्णांना नातेवाईक सीसीटीव्हीद्वारे पाहू शकणार

मुंबई – कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यास मनाई आहे. मात्र आता रुग्णालयांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार असून त्याद्वारे नातेवाईकांना आपल्या रुग्णांना पाहता येणार आहे अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. पण केवळ आयसीयूमध्येच सीसीटीव्ही लावण्यात येणार असून आयसीयूत दाखल असलेल्या रुग्णांना सीसीटीव्हीमुळे पाहता येणार आहे.

तसेच महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा समुह संसर्ग झालेला नाही, असे देखील टोपे यांनी यावेळी स्पष्ट केले. सध्या जे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत, ते संस्थात्मक क्वारंटाईन आणि होम क्वारंटाईन केलेले आहेत किंवा आधीच कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णाच्या थेट संपर्कातील आहेत. त्यामुळे राज्यात कोरोना विषाणूचा समुह संसर्ग झालेला आहे, असा निष्कर्ष आताच काढता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

IPL 2025 GT vs MI : आज मुंबई इंडियन्स-गुजरात टायटन्स भिडणार;...

0
मुंबई | Mumbai इंडियन प्रीमियर लीग (IPL) क्रिकेट स्पर्धेमध्ये आज (शनिवारी) गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघासमोर मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचे आव्हान असणार आहे. हा...