Saturday, July 27, 2024
Homeनाशिकवाहतूक कोंडीतून नागरिकांची मुक्तता; प्रशासनातर्फे फळ भाजी विक्रेत्यांवर कारवाई

वाहतूक कोंडीतून नागरिकांची मुक्तता; प्रशासनातर्फे फळ भाजी विक्रेत्यांवर कारवाई

नांदगाव | प्रतिनिधी

कन्नड घाटातून अवजड वाहनांसाठी वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याने ही अवजड वाहनांची वाहतूक नांदगाव मार्गानि वळविण्यात आली आहे. दर गुरुवारी आठवडे बाजार भरत असल्याने निर्माण झालेली वाहतुकीची कोंडी समस्या अखेर नगरपरिषद व पोलीस प्रशासनातर्फे फळ व भाजी विक्रेत्यांना फुटपाथवर बसण्यास मज्जाव केला गेल्याने रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली आहे.

- Advertisement -

नांदगाव-मनमाड-मालेगांव रस्त्यावर गुरुवारी आठवडे बाजार असल्याने वाहतूक कोंडी ही एक गांभीर समस्या बनली आहे. याप्रश्नी दै. ’देशदूत’ ने प्रथम आवाज उठविला होता. नगर परिषद व पोलीस प्रशासने या समस्येची गंभीरतेने दखल घेतल्याने वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण झाले आहे. शहरात वाढती वाहनांची संख्या, बेशिस्त वाहन चालक, अनधिकृत वाहनतळ यासारख्या विविध प्रश्नांमुळे शहरातील वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. शनीमंदिर येथील दोन्ही फुटपाथवर फळविक्रेत व भाजी विक्रेते बसत असतात.

यामुळे नागरिकांची एकच गर्दी होत असल्याने वाहतूक कोंडी निर्माण होत होती. या संदर्भात दै. ’देशदूत’ने वृत्त प्रसिध्द करताच सदर वृत्ताची नगरपरिषद व पोलीस प्रशासनाने आज दखल घेत रस्त्याच्या कडेला असलेल्या फळविक्रेते व भाजी विक्रेत्यांना फुटपाथवर बसून दिल्याने रस्त्यावर वाहतूक सुरळीतपणे सुरू झाली आहे.

नांदगाव-मनमाड-मालेगांव रस्ता हा रहदारीचा रस्ता असून छोट्या तसेच मोठ्या वाहनांची देखील वर्दळ असते. तसेच या रस्त्यावरून मुंबई, नाशिक, गुजरात, छत्रपती संभाजीनगर अशा ठिकाणी वाहनांची ये-जा सुरू असते. त्यामुळे शनी मंदिर हा भाग वाहतूक कॉर्डीसाठी प्रसिध्द झाला होता. नगर परिषद व पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे या रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या