Thursday, January 8, 2026
Homeनाशिकराज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची पुनर्रचना

राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची पुनर्रचना

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

राज्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींचा सामना करणाऱ्या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची पुनर्रचना करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष असून सदस्य म्हणून उपमुख्यमंत्री तथा वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार यांचा समावेश आहे.

- Advertisement -

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player

राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची पुनर्रचना करणारा शासन निर्णय गुरुवारी जारी करण्यात आला. त्यानुसार प्राधिकरणाचे सदस्य म्हणून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचा समावेश आहे. तर अशासकीय सदस्य म्हणून मुंबई आयआयटीचे प्रा. रवि सिन्हा, प्रा. दिपंकर चौधरी यांना प्राधिकरणात स्थान देण्यात आले आहे. तर राज्याचे मुख्य सचिव हे प्राधिकरणाचे पदसिद्ध सदस्य तथा मुख्य कार्यकारी अधिकारी असणार आहेत.

ताज्या बातम्या

Shrirampur : श्रीरामपुरात पोलीस पथकावर जमावाचा हल्ला

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur श्रीरामपुरातील वार्ड नं.1 इराणी गल्ली परिसरात शासकीय कर्तव्यावर असलेल्या पोलीस पथकावर हल्ला करण्याची, जमावाला भडकावून आरोपी सोडवण्याची आणि कोयत्याने जीवे मारण्याचा प्रयत्न...