मुंबई | Mumbai
केंद्र सरकारकडून (Central Government) प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस सेवा दलात अतुलनीय कार्य करणाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे. यात राज्यातील ४ पोलीस अधिकाऱ्यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक (President’s Medal) आणि ३९ जवानांना गुणवत्तापूर्ण सेवा पदके जाहीर झाली आहेत. त्यामध्ये नाशिक जिल्ह्याचे सुपुत्र संजय दराडे (Sanjay Darade) यांचाही समावेश आहे. दराडे हे नाशिकमधील मखमलाबादचे रहिवासी आहेत.
विशिष्ट सेवा पदकाचे (Service Medal) मानकरी म्हणून डॉ.रवींद्र कुमार झिले सिंग सिंगल, अतिरिक्त महासंचालक, महाराष्ट्र, दत्तात्रय राजाराम कराळे, महानिरीक्षक, महाराष्ट्र, सुनील बळीरामजी फुलारी, महानिरीक्षक, महाराष्ट्र आणि रामचंद्र बाबू केंडे, कमांडंट, महाराष्ट्र यांचा समावेश आहे.
गुणवत्तापूर्व सेवेचे महाराष्ट्रातील मानकरी
१) संजय भास्कर दराडे, महानिरीक्षक, महाराष्ट्र २) वीरेंद्र मिश्रा, महानिरीक्षक, महाराष्ट्र ३) S.M.T. आरती प्रकाश सिंह, महानिरीक्षक, महाराष्ट्र ४)चंद्र किशोर रामजीलाल मिना, महानिरीक्षक, महाराष्ट्र ५) दीपक कृष्णाजी साकोरे, उपमहानिरीक्षक, महाराष्ट्र ६) राजेश रामचंद्र बनसोडे, पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र ७) सुनील जयसिंग तांबे, पोलीस उपअधीक्षक, महाराष्ट्र ८) S.M.T. ममता लॉरेन्स डिसूझा, सहाय्यक पोलीस आयुक्त, महाराष्ट्र ९) धर्मपाल मोहन बनसोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, महाराष्ट्र १०) मधुकर माणिकराव सावंत, निरीक्षक, महाराष्ट्र
११) राजेंद्र कारभारी कोते, निरीक्षक, महाराष्ट्र १२) रोशन रघनाथ यादव पोलीस उपअधीक्षक, महाराष्ट्र १३) अनिल लक्ष्मण लाड, पोलीस उपअधीक्षक, महाराष्ट्र १४) अरुण केरभाऊ डुंबरे, सहाय्यक पोलीस आयुक्त, महाराष्ट्र १५) नजीर नासीर शेख, उपनिरीक्षक, महाराष्ट्र १६) श्रीकांत चंद्रकांत तावडे, उपनिरीक्षक, महाराष्ट्र १७) महादेव गोविंद काळे, उपनिरीक्षक, महाराष्ट्र १८) तुकाराम शिवाजी निंबाळकर, उपनिरीक्षक, महाराष्ट्र १९) आनंदराव पुंजाराव मस्के, सहाय्यक उपनिरीक्षक, महाराष्ट्र २०) रवींद्र बाबुराव वानखेडे, उपनिरीक्षक, महाराष्ट्र
२१) सुरेश चिंतामण मनोरे, निरीक्षक, महाराष्ट्र २२) राजेंद्र देवमान वाघ, उपनिरीक्षक, महाराष्ट्र २३) संजय अंबादासराव जोशी, सहाय्यक उपनिरीक्षक, महाराष्ट्र २४) दत्तू एकनाथ गायकवाड, सहाय्यक उपनिरीक्षक, महाराष्ट्र २५) नंदकिशोर ओंकार बोरोले, सहाय्यक उपनिरीक्षक, महाराष्ट्र २६) आनंद रामचंद्र जंगम, सहाय्यक उपनिरीक्षक, महाराष्ट्र २७) S.M.T. सुनिता विजय पवार, सहाय्यक उपनिरीक्षक, महाराष्ट्र २८) जितेंद्र विठ्ठल म्हात्रे, सहाय्यक उपनिरीक्षक, महाराष्ट्र २९) प्रफुल्ल रामचंद्र सुर्वे, सहाय्यक उपनिरीक्षक, महाराष्ट्र ३०) राजेंद्र शंकर काळे, सहाय्यक उपनिरीक्षक, महाराष्ट्र
३१) सलीम गनी शेख, सहाय्यक उपनिरीक्षक, महाराष्ट्र ३२) तुकाराम रावसाहेब आव्हाळे, सहाय्यक उपनिरीक्षक, महाराष्ट्र ३३) रामभाऊ संभाजी खंडागळे, हेड कॉन्स्टेबल, महाराष्ट्र ३४) संजय भास्करराव चोबे, हेड कॉन्स्टेबल, महाराष्ट्र ३५) सय्यद इक्बाल हुसेन सय्यद माथार हुसेन, सहाय्यक उपनिरीक्षक, महाराष्ट्र ३६) विजय दामोदर जाधव, हेड कॉन्स्टेबल, महाराष्ट्र ३७) रामराव वामनराव नागे, सहाय्यक उपनिरीक्षक, महाराष्ट्र ३८) दिलीप भोजुसिंग राठोड, हेड कॉन्स्टेबल, महाराष्ट्र ३९) आयुबखान अकबर मुल्ला, हेड कॉन्स्टेबल, महाराष्ट्र
कोण आहेत संजय दराडे?
नाशिक शहरामधील मुळचे मखमलाबाद गावचे भूमिपुत्र असलेले संजय भास्कर दराडे हे २००५ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. अगदी सर्वसामान्य कुटुंबातील प्रेस कामगार असलेले भास्कर दराडे यांचे ते सुपुत्र होय. भास्कर दराडे यांना तीन मुले असून यातील संजय दराडे हे मोठे तर दिलीप दराडे आणि शरद दराडे हे लहान आहेत. यातील दिलीप दराडे हे प्रादेशिक परिवहन विभागात मोटर वाहन निरीक्षक तर शरद दराडे हे आयपीएस आहेत. यामधील संजय दराडे यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मखमलाबाद गावात झाले. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण नाशिकमध्ये झाल्यानंतर त्यांनी पुणे येथे इंजिनिअरिंग कॉलेजमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंग विषयात शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी काही काळ कंपनीमध्ये काम करून लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देत आपल ध्येय निश्चित करण्यासाठी प्रयत्न केले.
यानंतर अतिशय मेहनत करून त्यांची भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाली. त्यांनी धाराशिव, यवतमाळ आणि नाशिक ग्रामीण जिल्ह्यांचे पोलिस अधीक्षक म्हणून काम केले आहे. तर २०१५ साली नाशिकमध्ये झालेल्या कुंभमेळ्याचा बंदोबस्त यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल त्यांना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कौतुकाचे पत्र दिले आहे. तर २०१७ मध्ये नाशिकचे जिल्हा पोलिस अधीक्षक असताना संजय दराडेंनी उत्तर प्रदेशातून येणारा बंदुकींचा अवैध शस्त्रसाठा जप्त करून, तब्बल ४४ बंदुका आणि तीन हजार काडतुसे पकडून आठ जणांची आंतरराज्य टोळी त्यांनी जेरबंद केली होती. त्यांची ही अत्यंत संवेदनशील आणि मोठी धडाकेबाज कारवाई होती. ही कारवाई अवघ्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरली होती. सध्या संजय दराडे कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून कामकाज बघत आहेत.