Sunday, May 19, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिकमध्ये कोविड रुग्णांसाठी विविध रुग्णालयात आरक्षित आहेत 'एवढ्या' खाटा

नाशिकमध्ये कोविड रुग्णांसाठी विविध रुग्णालयात आरक्षित आहेत ‘एवढ्या’ खाटा

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक महापालिका क्षेत्रात करोना बाधीतांचे वाढत असलेले संक्रमण पाहता सप्टेंबर महिन्याच्या 6 दिवसात कोविड रुग्णांचा आकडा 4 हजार 802 पर्यत गेला आहे. सरासरी 700 रुग्णांची भर पडत असुन अशाप्रकारे शहरातील रुग्णांचा आकडा 30 हजारावर पोहचला आहे….

- Advertisement -

वाढत असलेली रुग्ण संख्या लक्षात घेत मनपा प्रशासनाकडुन आता कोविड रुग्णांसाठी सात हजारावर खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. आजमितीस शहरात 68 रुग्णालयात महापालिकेकडुन 3 हजार 577 खाटा आरक्षित असुन यापैकी 2005 खाटा शिल्लक आहे. यामुळे कोविड रुग्णांसाठी शहरात कोणतीही कमरता नसल्याचे महापालिका प्रशासनाकडुन सांगण्यात आले.

शहरात जुन महिन्यात शेवटी प्रति दिन 150 रुग्ण वाढल्यानंतर जुलैत हा आकडा 200 च्यावर गेला होता. आता ऑगस्ट महिन्यात प्रतिदिन सरासरी 500 करोना बाधीत रुग्ण समोर आले होते. आता सप्टेंबर महिन्यात सहा दिवसात प्रति दिन 700 इतके नवीन रुग्ण समोर येत आहे.

बाधीत रुग्णांच्या संंपर्कात आलेले त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती, नातेवाईक, मित्रमंडळी यांच्याकडुन पुरेशी काळजी घेतली जात नाही. तसेच मास्क न वापरण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. परिणामी करोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे.

यातच महापालिकेने आरटीपीसीआर व अ‍ॅटीजेन चाचणी तीन हजारापर्यत नेल्यामुळे नवीन रुग्ण तात्काळ समोर येत आहे.

वाढत्या रुग्णांमुळे महापालिका प्रशासनाची चिंता वाढली आहे. बाधीत रुग्णांच्या संपर्कातील संशयितांवर उपचारासाठी महापालिकेकडुन सरकारी व खाजगी कोविड केअर सेंटर व रुग्णालयात मध्ये 7 हजारावर खाटा उपलब्ध करुन दिल्या आहे.

यातील ठक्कर डोम कोविड सेंटरमधील 280 खांटा रिक्त आहे. यामुळे एकीकडे रुग्ण वाढत असतांना दुसरीकडे महापालिकेकडुन रुग्णांना तात्काळ खाटा उपलब्ध करुन देण्यासाठी मोठी यंत्रणा कार्यरत केली असल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या