अहमदनगर | प्रतिनिधी
रेसिडेन्शिअल हायस्कूलमधील शिपाईनेच अल्पवयीन विद्यार्थीनींचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत तोफखाना पोलिस ठाण्यात शिपाई विरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
- Advertisement -
पीडित मुलगी ही शाळेत गेली असता शाळेतील शिपाई आत्माराम बापुराव लगड (वय ५८ रा. आठवड ता. नगर) याने मुलीशी शाळेतच अश्लील वर्तन करुन लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. मुलगी शाळा सुटल्यानंतर घरी गेल्यानंतर आईला घडलेली घटना सांगितली. त्यानंतर पिडीताच्या आईच्या फिर्यादीवरून शिपाई लगड विरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपी लगड याला तोफखाना पोलीसांनी अटक केली असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक मुंडे हे करीत आहेत.