Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यालोकसभा निवडणूक होण्याआधीच केंद्रीय निवडणूक आयुक्तांचा राजीनामा

लोकसभा निवडणूक होण्याआधीच केंद्रीय निवडणूक आयुक्तांचा राजीनामा

नवी दिल्ली । वृत्तसंस्था

देशात आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून पुढील काही आठवड्यात लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, या निवडणुकीपूर्वीच निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा कार्यकाळ 2027 पर्यंत होता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अरुण गोयल यांचा राजीनामा स्वीकारला आहे.

- Advertisement -

निवडणूक आयोगात यापूर्वीच निवडणूक आयुक्त पद रिक्त होते. अरुण गोयल यांच्या राजीनाम्यानंतर आता निवडणूक आयोगात आयुक्तांची दोन पदे रिक्त आहेत. अरुण गोयल यांच्या राजीनाम्यानंतर आता फक्त मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे आहेत. मुख्य निवडणूक आयुक्तांव्यतिरिक्त निवडणूक आयोगात आणखी दोन निवडणूक आयुक्त असतात.

आता निवडणूक यंत्रणेची संपूर्ण जबाबदारी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या खांद्यावर आली आहे. अरुण गोयल यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांसोबत निवडणूक तयारीसाठी अनेक राज्यांचा दौरा केला होता. आता त्यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या संदर्भात केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्रालयाने शनिवारी जारी केलेल्या राजपत्रातील अधिसूचनेत म्हटले आहे की, राष्ट्रपतींनी निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा स्वीकारला आहे, जो 9 मार्च 2024 पासून प्रभावी मानला जाईल.

दरम्यान, 2022 मध्ये अरुण गोयल यांनी दिल्लीत निवडणूक आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला होता. विशेष म्हणजे अरुण गोयल हे 1985 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी 18 नोव्हेंबर 2022 रोजी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि दुसर्‍याच दिवशी त्यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती झाली होती.त्यांची ही नियुक्ती वादात अडकली होती. या नियुक्तीला सर्वोच्च न्यायालयात आव्हानही देण्यात आले होते. अरूण गोयल यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे तर मग त्यांना इतक्या तातडीने निवडणूक आयुक्तपद का दिले गेले? असे सर्वोच्च न्यायालयाने सरकारला विचारले होतें.

- Advertisment -

ताज्या बातम्या