Friday, May 3, 2024
Homeधुळेप्रगत राष्ट्रांपेक्षा भारतात महिलांचा सन्मान

प्रगत राष्ट्रांपेक्षा भारतात महिलांचा सन्मान

दोंडाईचा Dondaicha । प्रतिनिधी

अमेरीकेत लोकशाहीची (Democracy) स्थापना होऊन 300 वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला तरी देखील महिलांना (women) आपल्या हक्कासाठी लढावे (Fight for rights) लागले. त्यांनी मतदानासाठी, सार्वजनिक वाहतूकमध्ये आसनासांठी मोठे आंदोलन उभारल्याची इतिहासात नोंद आहे. त्याउलट भारतात (India) लोकशाही स्थापन होऊन 75 वर्षांपेक्षा कमी काळ झाला आहे. तरीदेखील भारताच्या महिला सर्व क्षेत्रात प्रगती करीत आहेत. आज भारतीय महिला देशाच्या सुरक्षा सिमेवर देखील गस्त घालण्यास सज्ज झाल्या आहेत. म्हणुन भारताच्या प्रगतीत महिलांचे (women) सारखे योगदान आहे, असे गौरवोद्गार माजी मंत्री आ. जयकुमार रावल (MLA Jayakumar Rawal) यांनी काढले.

- Advertisement -

दोंडाईचा शहर भाजपा महिला आघाडीतर्फे (BJP Women’s Front) महिला दिनानिमित्त महिला मेळावा (Women’s meet) घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.जयकुमार रावल हे होते. यावेळी ते बोलत होते.

प्रमुख पाहुणे म्हणून जि.पच्या उपाध्यक्षा कुसुम निकम, महिला व बालकल्याण सभापती धरती देवरे, भाजपाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सविता पगारे, बचत गटाच्या समन्वयक पुजा खडसे, वैद्यकीय अधिकारी डॉ.युतिका भामरे, भाजपा दोंडाईचा शहराध्यक्ष प्रविण महाजन, माजी उपनगराध्यक्ष रविंद्र उपाध्ये, माजी पाणीपुरवठा सभापती वैशाली महाजन, माजी आरोग्य सभापती मनिषा जितेंद्र गिरासे, माजी शिक्षण सभापती सुफीयान तडवी, शहराध्यक्ष महिला आघाडी दोंडाईचा प्रा.ईशरतबानु शेख, आत्मनिर्भर भारताच्या जिल्हाध्यक्ष राखी उपाध्ये आदी उपस्थित होते.

सविता पगारे यांनी महिलांसाठी केंद्र शासनाच्या योजनांची (Government schemes) माहिती दिली. धरती देवरे यांनी महिलांना प्रगतीची समान संधी असुन शिक्षणामुळे महिलांना सन्मान प्राप्त होत असल्याचे सांगितले. पुजा खडसे यांनी महिलांनी बचत गटाच्या (Savings group) माध्यमातून स्वयंरोजगार निर्माण केल्याचे सांगितले.

कार्यक्राचे सुत्रसंचलन सुवर्णा कुचेरीया, ज्योत्स्ना पवार, प्रिती पाठक यांनी केले. तर आभार रोहिणी पाटील यांनी मानले.

कार्यक्रमात विविध स्पर्धांचे परिक्षण कुमुद अग्रवाल, टिना उपाध्ये, वैशाली महाजन, मनिषा गिरासे, इंदीरा रावल, जयश्री अहिरराव व मनिषा गुजराथी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.ईशरतबानु शेख, राखी उपाध्ये, सुवर्णा कुचेरीया, टिना उपाध्ये, रोहिणी पाटील, कुमुद अग्रवाल, मनिषा निकम, प्रिती पाठक, मनिषा गुजराथी, गायत्री उपाध्ये, ईशा गुप्ता, शाहिन शेख आदींनी प्रयत्न केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या