Tuesday, February 3, 2026
HomeनगरPathardi : ओढ्यात वाहून गेलेल्या सेवानिवृत्त शिक्षकाचा मृतदेह सापडला

Pathardi : ओढ्यात वाहून गेलेल्या सेवानिवृत्त शिक्षकाचा मृतदेह सापडला

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

तालुक्यातील धायतडकवाडी शिवारात बोरीच्या ओढ्यात शुक्रवारी सायंकाळी दुचाकीसह वाहून गेलेले तीनखडी (ता.पाथर्डी) येथील सेवानिवृत्त शिक्षक पांडुरंग निवृत्ती आंधळे (वय 72) यांचा शनिवारी पहाटे मृतदेह जोगेश्वरी मंदिराजवळ आढळून आला.

- Advertisement -

पांडुरंग आंधळे शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास पाथर्डीवरून दुचाकीने आपल्या गावाकडे जात असताना धायतडकवाडी हद्दीतील बोरीच्या ओढ्यात दुचाकीसह वाहून गेले. दरम्यान, त्या वेळेस मोहटादेवी परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे ओढ्याला मोठा पूर आला होता. पुलावरून पाणी वाहत असतानाही आंधळे यांनी दुचाकीवरून रस्त्यावरील पूल ओलांडण्याचा प्रयत्न केला. मात्र पुलावरून जाणार्‍या पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने ते दुचाकीसह वाहून गेले.घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तातडीने प्रशासनाला कळविले.

YouTube video player

तहसीलदार उध्दव नाईक, पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांनी तत्काळ पथकासह शोधकार्य सुरू केले. मात्र रात्री अंधार आणि पाण्याचा जोरदार प्रवाह यामुळे शोध मोहिमेत अडथळे आले. शनिवारी पहाटे सहा वाजता धायतडकवाडी शिवारातील जोगेश्वरी मंदिराजवळील ओढ्यामध्ये पांडुरंग आंधळे यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे तिनखडी गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

ताज्या बातम्या

Praful Patel : प्रफुल पटेलांनी घेतली पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांची...

0
दिल्ली । Delhi महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल...