अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्हाधिकारी कार्यालयात 1 ऑगस्टपासून महसूल कर्मचार्यांसाठी फेसअॅप आणि जिओ-फेन्सिंग सिस्टमचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. महसूल विभागाच्या सुत्रांकडून याबाबत माहिती देण्यात आली असून या नवीन प्रणालीमुळे फेसअॅपवर नोंदणीकृत कर्मचार्यांनाच ऑगस्ट महिन्यांचा पगार मिळेल, जो सप्टेंबरमध्ये वितरित केला जाणार आहे.
राज्य सरकारच्या महसूल विभागाकडून याबाबत घोषणा करण्यात आली होती. प्रशासनात अधिक पारदर्शकता, कार्यक्षमता आणि जनता-केंद्रित दृष्टिकोन आणण्याच्या उद्देशाने सरकारच्या निर्देशानुसार हे पाऊल उचलण्यात आले आहे.
डिजिटल उपस्थिती साधनांचा परिचय हा स्मार्ट प्रशासनाकडे महसूल विभागाचे हे पाऊल पुढे टाकणारा आहे. फेसअॅप, जिओ-फेन्सिंगसह एकत्रित, नियुक्त केलेल्या कार्यालयीन ठिकाणांमधून प्रत्यक्ष उपस्थितीचे काटेकोरपणे निरीक्षण करत येणार आहे. नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व प्रथम या प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. याबाबत सुत्रांच्या माहितीनूसार 1 ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयात आणि याबाबत सरकारकडून आदेश आल्यानंतर जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयात हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.
या प्रणालीत कार्यालय हजेरीसाठी फेसअॅपमुळे कर्मचार्यांची कार्यालयातील उपस्थिती काटेकोरपणे तपासता येणार आहे. तसेच ऑगस्टमध्ये लागू करण्यात करण्यात येणार्या या प्रणालीनूसार सप्टेंबर महिन्यांचा पगार काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.




